कल्याण डोंबिवलीत खंडणीखोर तथाकथित पत्रकारांमुळे खऱ्या व इमानदार पत्रकारांना नामुष्की सहन करावी लागत आहे. एका तथाकथित महिला प्रतिनिधीला १ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर २० हजार रुपये घेतांना खडक पाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हॉटेल मालकाकडे दरमहिन्याला १ लाख रुपये देण्याची धमकी देत हॉटेल बंद करण्याचा इशारा तिने दिला होता. यानंतर हॉटेल मालकाने तक्रारी नंतर २० हजार रुपये घेताना योगिता जोशी हिला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये युट्युब चॅनल बनवून त्या व्दारे खंडणी वसुलीचा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावत असून खऱ्या पत्रकारांना यांच्यामुळे काही प्रमाणात नामुष्की आणि मुसकट दाबी होतांना दिसत आहे.
कल्याण पश्चिमेतील मुक्तीनगर मध्ये चस्का हॉटेल मालका कडे दरमहा १ लाख रुपये देण्याची धमकी दिली होती. नाही दिले तर हॉटेल चालू देणार नाही अशी बतावणी केली होती. यानंतर मालकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर प्रतिनिधी महिला योगिता जोशी हिला २० हजार रुपये घेतांना पोलिसांनी अटक केली. मात्र या चस्का हॉटेल मध्ये असे नेमके काय चालते की मालका कडे युट्युब चॅनल चालवणारी तथाकथित महिला पत्रकार १ लाख मागते याकडे ही सर्व कल्याणकराचे लक्ष गेले आहे. त्यामुळे महिलेच्या चौकशी बरोबरच या हॉटेलच्या कारभाराची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. योगीता जोशी हिने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळला असल्याने शनिवारी दुपारी खडक पाडा पोलिसांनी तिला अटक केली आहे.
-रोशन उबाळे

