कल्याण-डोंबिवली घडामोडी लेख

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला ‘आयपीएल लिलावा’ प्रमाणे रंग; राजकारण्यांच्या बेडूक उड्यांनी पक्षनिष्ठेला सुरुंग

कल्याण : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय पक्षप्रवेशांचा धडाका सुरू झाला आहे. किंबहुना एकाच युती आघाडी मधील राजकीय पक्ष एकमेकांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. विशेषतः कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप मध्ये आपसातच ही पक्षप्रवेशाची रस्सीखेच सुरू असून एकमेकांचे दिगग्ज पदाधिकारी व माजी नगरसेवक आपल्या पक्षात खेचून घेण्याचे […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण पूर्वेत भाजपा पक्ष प्रवेश सोहळ्याने संघटनेला नवी ऊर्जा

कल्याण : आमदार सुलभा गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात नुकताच भारतीय जनता पक्षात भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विजय जोशी, शीतल मंडारी, केतन रोकडे, स्नेहल रोकडे, विकी जोशी, प्रल्हाद शेळके यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपाच्या संघटनेला कल्याण […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

News : Mahesh Gaikwad भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम; शिंदेंनी राखली ५५ हजार मतांची ताकद

Mahesh Gaikwad News : शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समवेत अन्य काही माजी नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी सामील होणार आहेत. मात्र याच यादीत दुसरे महत्त्वाचे नाव महेश गायकवाड यांचे असल्याच्या चर्चांना दिवसभरात उधाण आले होते. मात्र म्हात्रेंच्या भाजप प्रवेशाच्या पूर्वसंध्येस एकनाथ शिंदेंनी महेश गायकवाड यांच्या खांद्यावर […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

Dombivli : Bhajan Bhavan चे लोकार्पण; भजन परंपरेला नवे व्यासपीठ

Bhajan Bhavan Dombivli : भजन ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असून, डोंबिवलीलाही या समृद्ध परंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेला नवे व्यासपीठ मिळावे या हेतूने डोंबिवली पश्चिम येथील गणेश घाट परिसरात ‘डोंबिवलीकर भजन भवन’ उभारण्यात आले आहे. आमदार विकास निधीच्या माध्यमातून डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेच्या या नव्या वास्तूचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवली : डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित रासरंग आजपासून सुरु

डोंबिवली रासरंग : डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर रासरंग २०२५ च्या भव्य उत्सवाला सुरुवात होणार आहे. सायं. ७.३० ते रात्री १० पर्यंत दांडिया आणि गरबा रास रंगणार असून या कार्यक्रमासाठी जगविख्यात दांडिया किंग नैतिक नागदा आणि त्यांचा वाद्यवृंद कलाकारांचा समूह उपस्थित राहणार असून, ते सलग १० दिवस […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याणच्या कुस्तीगीर Vaishnavi Patil ची भारतीय संघात निवड

Vaishnavi Patil : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२३ मध्ये उपविजेत्या ठरलेल्या मांगरूळ गावच्या वैष्णवी पाटीलने ६५ किलो वजनी गटातील चाचणीत यश मिळवून पहिल्यांदाच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. हरियाणाच्या मुस्कानचा ७-२ ने एकतर्फी पराभव करून वैष्णवीने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. दि.१३ ते २१ सप्टेंबर दरम्यान झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्य […]

होम

Kalyan मध्ये Dengue मुळे एकाचा मृत्यू

Dengue in kalyan: शहरात मागील काही दिवसांपासून डेंगूने डोके वर काढले असून कल्याण पूर्वेत एका तरुणाचा डेंगूमुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. विलास म्हात्रे Vilas Mhatre (३१) असे या मृत तरुणाचे नाव असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. दरम्यान गुरुवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. डेंगूच्या वाढत्या फैलावा संदर्भात मनसेने […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

Kalyan to pandharpur bus msrtc : आषाढी पंढरपूर वारीसाठी

Kalyan to pandharpur bus msrtc : कल्याण व आसपासच्या शहरी व ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार यंदा कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातुन आजपासून (दि.४) जवळपास १६ एसटी बसेस मार्गस्थ होणार आहेत. याचा लाभ कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा येथील भाविकांना मिळणार आहे. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून हरी नामाचा […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

Rickshaw strike : रिक्षा चालकांचा चक्का जाम आंदोलनाचा ईशारा

Rickshaw strike : रिक्षा प्रवासात एकावेळी तीन हुन अधिक प्रवासी प्रवास करीत असल्यास सदर रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी आता संपूर्ण शहरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. सोमवारी या संदर्भात चक्कीनाका येथील वाहतूक उपशाखेत निवेदन देण्यात आले आहे. ओव्हर सीट बसविल्यानंतर वाहतूक […]