क.डों.म.पा. क्षेत्रात आज ८८१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने होळी, धुलीवंदन या सणांवर बंधने लादली आहेत.
महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना होळी व धुलिवंदन खाजगी तसेच सार्वजनिक जागेत सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. ‘मी जबाबदार’ मोहिमे अंतर्गत वैयक्तिकरित्या देखील उत्सव टाळावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर साथीरोग नियंत्रण कायदा तसेच आपत्ती निवारण कायद्या अनव्ये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. दि.२८ मार्च रोजी होळी तर २९ मार्च रोजी धुलिवंदन असून यावर प्रशासनाची नजर असणार आहे. त्यामुळे यावर्षी रंगाचा बेरंग होऊ शकतो यात शंका नाही.
खुप खुप धन्यवाद,KDMC आयुक्त सुर्यवंशी साहेब.आपण हा होली आणी रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय घेतला.
पण यावर पोलिस निरीक्षक यांनाही कडक कारवाई चे आवाहन करावे.
मोठी खंत वाटते,जो आकडा सुरवातीला ४०० पार झाला नाही तो आता उतरत्या काळात ९०० वर पोहोचतो,ही फारच दुर्दैवी घटना आहे.