कल्याण शहर हे गर्दिचे व धकाधकीचे शहर बनले असून शहर वासियांची गरज व मागणी लक्षात घेता गॅस सिलिंडर बंद करून पाईप द्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
बऱ्याचशा वस्त्या व मोठमोठय़ा बिल्डिंगमध्ये लोक दाटीवाटीने राहतात तसेच सिलिंडर स्फोट होऊन पुन्हा लालबाग मधील साराभाई बिल्डिंग गॅस सिलेंडर स्फोटाची पुनरावृत्ती होऊन दुर्घटना घडू नये, हा संभाव्य धोका लक्षात घेऊन, तसेच सिलेंडर पेक्षा गॅस पाईप स्वस्त सुद्धा आहे.
तसेच हल्ली दामपत्य नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर पडत असल्याने गॅस सिलिंडर डिलिव्हरी घेण्याचा सुध्दा मोठा प्रश्न उद्भवतो. लोकांच्या ह्या समस्या लक्षात घेता कल्याण पश्चिम भागात पाईपद्वारे घरापर्यंत गॅस पोहचवणे खुपच गरजेचे आहे. त्यामुळे या अतिआवश्यक व लोकांच्या सुरक्षिततेचा जाणीवपूर्वक विचार करून निर्णय घेत कल्याण शहरात घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याची मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
-कुणाल म्हात्रे