घडामोडी

टिटवाळ्यातील नारायण सिंग बनला राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियन

कल्याण : महाड- रायगड येथे ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान सबज्युनिअर मुले व मुलींच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत टिटवाळा येथील नारायण सिंग याने उत्कृष्ठ कामगिरी करत सुवर्ण पदक  मिळवले.

 नारायण ने पहिला सामना पुण्याच्या आदी सोमु विरूद्ध पहिल्या राऊंड मध्येच, तर उपांत्यपूर्व फेरी व सेमीफायनल सामन्यात प्रतिस्पर्धीना जोरदार ठोसे मारले त्यामुळे रेफ्रीने पहिल्या राऊंड मधेच नारायणला विजयी घोषित केले, तर अंतिम सामना मुंबईच्या अवधूत कोलते विरुध्द ५-० अशा प्रकारे जिंकुंन सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

नारायण सिंग हा टिटवाळा येथे गणेशनगर विद्यालयात नववीत शिकत आहे. विनायक बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक संतोष मुंढे यांच्या मार्गदरशनाखाली मागील ४ वर्षापासून सराव करीत आहे. मागील राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने कांस्य पदक मिळवले होते.  नारायण सिंगच्या या यशात कोच संतोष मुंढे यांच्यासोबतच त्याचे क्रीडा शिक्षक असलेले वडील जितेंद्र सिंग व आई सुषमा सिंग तसेच विनायक बॉक्सिंग क्लबचे अध्यक्ष विनायक कोळी यांच्याही मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.

त्याच्या या यशाबद्दल टिटवाळा वासियांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून व पुढील वाटचालीसाठी नारायण सिंगला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *