कल्याण-डोंबिवली घडामोडी

ठाकुर्लीतील खंबाळपाड्यात एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी

ठाकुर्ली :- खंबाळपाडा ९० फुटी रस्त्यावर रात्री १ च्या सुमारास रिक्षा अडवून लुटण्याचा बहाण्याने तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. यात एका इसमाचा मृत्यू झाला असून डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही हत्या कशी घडली याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू झाला आहे.

खंबाळपाडा मधील ९० फुटी रस्त्यावर काल मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञातांनी रिक्षामधून खाली उतरवून दोन प्रवाशांना बेदम मारहाण केली. लुटीच्या इराद्याने मारहाण केली असल्याचं बबलू चव्हाण या जखमी इसमाने पोलिसांना सांगितले आहे. याचं घटनेत बेचलप्रसाद चव्हाण यांचा गळा कापून त्यांना रेल्वे ट्रॅक वर फेकले. तर जखमी बबलू चव्हाण यांनी झाडीमध्ये लपून स्वतःचा जीव वाचवला अशी माहिती त्याने दिली आहे. या हल्ल्यात तो ही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान लुटीच्या इराद्याने एकाची हत्या झाल्याच्या माहितीने परिसरात खळबळ माजली आहे .

पंचनामा आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे डोंबिवली रेल्वे पोलीस व टिळक नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात आणखी कोणत्या बाजू असू शकतात का ? याचा कसोशीने शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

-रोशन उबाळे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *