डोंबिवलीतील मानपाडा मुख्य रस्त्यावरील ऑप्टिलाईफ हॉस्पिटल शेजारील शिवाजी उद्योग नगर पोलीस चौकी समोरील शिवम मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोकड आणि सामानाची चोरी केली. भर रस्त्यावर चोरी झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
डोबिवली शहरातील दुधनाथ यादव यांच्या शिवम मेडिकलचे शटर उचकवून चोरट्यांनी सकाळी ५ च्या दरम्यान दुकानात प्रवेश केला. दुकानातील १५ हजाराची रोकड आणि कॉस्मेटिक सामान चोरले. शहराच्या सदैव वर्दळ असणाऱ्या भागात हि घटना घडल्याने चोरांची हिम्मत वाढविल्याचे दिसून येत आहे. दुकानाच्या बाजूला २४ तास चालणारे ऑप्टिलाईफ हॉस्पिटल आहे. या भागात सदैव पेशंटची येजा असते असे असतांना देखील चोरांनी केलेली हिम्मत चिंताजनक आहे.
दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये चोराचा चेहरा दिसून येत असून रोकड आणि सामान पिशवी मध्ये भरतांनाचे फुटेज मिळाले आहे. याबाबत दुकानदाराने पोलिसांकडे प्राथमिक तक्रार दिली असून फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
-कुणाल म्हात्रे