अतीधोकादायक इमारतीमुळे संभाव्य दुर्घटना घडु नये म्हणून मनपा प्रशासनाने अतिधोकादायक इमारतीवर निष्कसनाच्या कारवाई चा बडगा उचला असुन “ड” प्रभाग क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतीचे पाडकामास प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने गुरुवारी सुरुवात केली. धोकादायक इमारती मधील रहिवाशांचे स्थलांतरित करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.
उप आयुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड’ प्रभागाच्या वतीने कल्याण पुर्वेतील हनुमान नगर परिसरातील विश्वास विघालय या अतिधोकादायक तळ +दोन मजले इमारतीचे पाडकामास “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने गुरुवारी सुरुवात केली. या अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम कर्मचारी वर्ग, हातोडा, ईलेक्टीकल ब्रेकर यांच्या मदतीने करण्यात येत आहे.
-कुणाल म्हात्रे