कल्याण : नागरिकांना त्यांच्या विविध कामासाठी महापालिका मुख्यालयात वारंवार यावे लागू नये म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी, त्यांच्या तक्रारींचे निवारण त्वरित करण्यासाठी तसेच त्यांच्या निवेदनांवर कार्यवाही करण्यासाठी आता आठवडयातील एक दिवस नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आला असून विभागीय उपआयुक्तांनी या दिवशी त्यांच्या अखत्यारीतील प्रभाग कार्यालयात थांबुन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
या जनता दरबाराची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे :-
1/अ प्रभाग–बुधवार–दुपारी 3.00 ते 4. 00 – 1/अ प्रभाग कार्यालय
2/ब प्रभाग– गुरुवार–दुपारी 4.00 ते 5.00 – 2/ब प्रभाग कार्यालय
3/क प्रभाग– मंगळवार दुपारी 3.00 ते 4.00 – 3/क प्रभाग कार्यालय
4/जे प्रभाग- बुधवार–दुपारी 4.00 ते 5.00 – 4/जे प्रभाग कार्यालय
5/ड प्रभाग– बुधवार–दुपारी 3.00 ते 4.00 – 5/ड प्रभाग कार्यालय
6/फ प्रभाग–बुधवार –दुपारी 3.00 ते 4.00 – 6/फ प्रभाग कार्यालय
7/ह प्रभाग- गुरुवार-दुपारी 3.00 ते 4.00 – 7/ह प्रभाग कार्यालय
8/ग प्रभाग– गुरुवार – दुपारी 4.00 ते 5. 00 – 8/ग प्रभाग कार्यालय
9/आय प्रभाग–गुरुवार –दुपारी 4.00 ते 5. 00 – 9/आय प्रभाग कार्यालय
10/ई प्रभाग– शुक्रवार – दुपारी 4.00 ते 5. 00 –10/ई प्रभाग कार्यालय
या जनता दरबाराचा प्रारंभ पुढील आठवडयापासून होणार आहे.
-कुणाल म्हात्रे
राजू नगर गणेश नगर चा परिसर अतिशय गलिच्छ आहे सकाळी झाडू कामगार फक्त नगरसेवकाच्या ऑफिस समोरची नावापुरती साफसफाई करतात परंतु पूर्ण रस्ता आजूबाजूचा परिसर कचराकुंडी ने भरलेला असतो पाण्याचा अपव्यय भरपूर होत आहे खूप लाईन अगदी गणेश घाटापर्यंत सतत पाणी वाहत असते. कोणीही अधिकारी इकडे फिरकत नाही. ऑनलाइन तक्रार करूनही काही उपयोग होत नाही गरीबाचा वाडा नवापाडा रोड खंडोबा मंदिर रोड अतिशय गलिच्छ आहे माननीय आयुक्त ज्यांनी आपला व्हाट्सअप नंबर शेअर करावा तरच आपल्या पर्यंत तक्रारी पोचवता येतील पाण्याचे ड्रेनेज लाईन ओपन आहे मच्छरांचा त्रास होतो आहे खंडोबा रोड कडे काही टॉयलेटच्या लाईन ओपन आहे कार्तिक सोसायटीसमोर लाईन ओपन आहेत भटक्या कुत्र्यांचा खूप त्रास होतो दिवसभर स्ट्रीट लाईट चालू असतात याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावयाची आवश्यकता आहे