मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देऊनही गैरहजर दाखविले आहे. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. अश्या काही विद्यार्थ्यांची तक्रार विद्यार्थी भारती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे आली अशी माहिती विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.
विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख विनोद पाटील यांची भेट घेत संबंधित विषयावर चर्चा केली व पत्रव्यवहार करत विद्यार्थ्यांचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावं असे आव्हान विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा जया गणाई यांनी केले.
परीक्षा विभागाचे प्रमुख विनोद पाटील यांनी तक्रार आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे डिटेल्स मागवून त्या महाविद्यालयातील जबाबदार पदाधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी दिली.
विद्यापीठासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा असे आवाहन विद्यार्थी भारतीच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी संपर्क क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. 9321638034 / 8097834167 / 8104571787
-कुणाल म्हात्रे