कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळ येथे आय सी आय सी आय चे ए टी एम चोरटयांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास फोडले असून त्यातील लाखोंची रक्कम लंपास केली आहे. विठ्ठल नगर येथे चोरट्याने गॅस कटर च्या साहाय्याने बँकेच्या ए टीएम वर डल्ला मारला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून कोरोना काळात चोरांची हिम्मत वाढल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वीही रायते गावात याच महामार्गावर आठ दुकाने फोडण्यात आली होती. संबंधित घटनेचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून लवकरच दरोडे खोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळणार आहे असे समजते. दरम्यान कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी घटना स्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. शोधकार्यासाठी इमारतील कॅमेऱ्याचे फुटेज देखील ताब्यात घेतले आहेत. या गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई आणि साहय्यक पोलीस निरीक्षक आर पी पवार यांचे पथक करीत आहे.
-रोशन उबाळे

