जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने कल्याण येथे आरएसपी अधिकारी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्या उपस्थितीत स्वामी नारायण हॉल ट्रस्टचे दिनेश ठक्कर, रुपेश भोईर यांच्या हस्ते रहेजा कॉम्प्लेक्स, लोक उद्यान, गुरुद्वारा कंपाऊंड या ठिकाणी लिंब, चिंच,पिंपळ, वड या वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने नैसर्गिक ऑक्सिजनची कमी भासत आहे. कोरोनाच्या महामारीत ऑक्सीजन लेवल कमी झाल्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला म्हणून एक मूल एक झाड ही संकल्पना घेऊन प्रत्येकाने आपल्या परिसरातील मैदानात सोसायटीच्या आवारात रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संकल्प करावा व येणाऱ्या काळात ऑक्सिजन अभावी दुर्घटना होऊ नयेत यासाठी या उपक्रमात सर्व बंधू-भगिनी सहभाग घ्यावा असे आवाहन आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी यांनी केले. स्वामीनारायण ट्रस्टचे दिनेश थक्कर यांनी पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी १०० झाडांच्या रोपांची व्यवस्था केली.
-कुणाल म्हात्रे