बेघर आणि गरजू लोकांचे पावसापासून रक्षण व्हावे यासाठी कल्याण पश्चिमेतील ‘अलका सावली’ प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दरवर्षी गरजू लोकांना छत्री वाटप करण्यात येते. यावर्षी देखील संस्था हा उपक्रम राबवत असून कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते काही लोकांना छत्री देऊन आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अलका सावली प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे मार्फत वर्षभर असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यात आरोग्य शिबिर, आदिवासी पाड्यावरील लोकांना कपडे, गरजूंना अन्नधान्य वाटप व करोना काळातही ज्या वस्तूंची गरज ती म्हणजे मास्क, सॅनीटायझर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजू विद्यार्थ्यांना सायकली, लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, खेळणी वाटप, गरजू महिलांसाठी अनेक उपक्रम ही संस्था नेहमी राबवत असते.
विद्यार्थ्यांसाठीही विविध उपक्रम त्यात चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम घेतले जातात. अलका सावली प्रतिष्ठान हि संस्था सतत पाच वर्षापासून अखंड कार्यरत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांनी दिली. आज या छत्री वाटप उपक्रमाचा शुभारंभ पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्तांनी देखील या संस्थेच्या कार्याचे कौतुक करत इतर संस्थांनी देखील असा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
संस्थेने राबवलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचे नागरिकांकडून नेहमी कौतुक होत असते. यावेळी संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांच्यासह, कला शिक्षक यश महाजन, सागर वाघ, आकाश वायले, बंड्या कराळे, शरद शेलार, अनिकेत वायले, दीपक सिन्हा यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.