कोरोना निर्बंधांमुळे राज्यात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी कल्याण पूर्वेतील तिसाई जरी मरी मंदिर येथे भाजपाच्या वतीने शंखनाद आंदोलन करण्यात आले. मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलायेंगे अशा घोषणा देत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येथील मंदिराचे दार उघडत आत जाऊन पूजा अर्चा केली.
संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर -धार्मिक स्थळे बंद असे काळे चित्र उभे केले आहे. या काळ्या निर्णयाविरेधात आणि मंदिरे-धार्मिक स्थळे तातडीने उघडावीत या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्मांचार्य, साधु-संत, अनेक धार्मिक संघटना यांसह पुरोहित, फुल-प्रसाद विक्रेते एकत्र येत अध्यात्मिक समन्वयक आघाडी च्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे व आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कल्याण पूर्व मंडळाअंतर्गत जागृत देवस्थान तिसाई मंदिर, तिंसगांव, कल्याण पूर्व येथे टाळ, घंटा, शंख वाजवत ‘मंदिर हम खुलवायेंगे। धर्म को न्याय दिलायेंगे।। हा नारा देत मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, परिवहन समिती माजी सभापती सुभाष म्हस्के, ह.भ.प चंद्रकांत सांगळे महाराज, कल्याण पूर्व मंडल सरचिटणीस नितेश म्हात्रे, अरुण दिघे, संदीप तांबे, पांडुरंग भोसले, गुड्डू खान, नगरसेविका हेमलता पावशे, अॅड. राखी बारोद आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
-कुणाल म्हात्रे
