कल्याण-डोंबिवली घडामोडी

‘या’ निमित्ताने कल्याण पूर्वेत आमदार खासदार दिसले एकत्र

कल्याण : कल्याण पूर्वेत ‘अंतर्राष्ट्रीय अग्रहरि वैश्य’ समाजाच्या वतीने महाराजा ‘श्री अग्रसेन’ यांची ५१४५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि साध्वी सरस्वती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे जवळपास दोन वर्षांनी खासदार शिंदे आणि आमदार गायकवाड हे एकाच मंचावर उपस्थित होते.

       यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराजा अग्रसेन यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत सांगितले कि, जे महाराजा अग्रसेन यांनी ५१४५ वर्षे आधी सांगितले होते त्या गोष्टी आज देखील समाजामध्ये लागू होतात. संस्थेचे राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष योगेश अग्रहरी (के. एस. गुप्ता) यांनी सांगितले कि, आम्ही अग्रहरी समाजाचे लोकं महाराजा श्री अग्रसेन यांचे वंशज असून आज त्यांच्या जयंती समारोहात त्यांच्या आठवणींना उजाळा देत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  आमदार गणपत गायकवाड यांच्यासह कथा वाचक साध्वी सरस्वती, शिवसेना कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटिल, अंतराष्ट्रीय अग्रहरि समाचाचे मुकेश अग्रहरि, दिनेश अग्रहरि आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *