कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक उपशाखा कल्याण, स्वामी नारायण हॉल, कच्छ युवक संघ अंतर्गत कल्याण स्टेशन परिसारत गोरगरिबांना मोफत अन्न वाटप करण्यात आले.
कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करीत अन्न वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी पोलीस आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत वहातुक शहर उपशाखा कल्याण व स्वामी नारायण हॉल, कच्छ युवक संघ यांच्या तर्फे सकाळी व संध्याकाळी दोन टाईम अन्न वाटप करण्यात येईल.
यावेळी वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक कल्याण सुखदेव पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील उपस्थित होते.
-कुणाल पाटील