महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दुसर्या लाटेमध्ये कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना गोर गरीब, हातावर पोट असणाऱ्या जनतेचे अन्न व वस्त्र या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जिकिरीचे झाले होते. अशातच शिवकन्या प्रतिष्ठानच्या वतीने ढोलेवाडी, नाशिक येथील गरीब आणि गरजू जनतेसाठी कपडे कपडे वाटप करण्यात आले.
यामध्ये लहान मुलांचे कपडे, महिलांसाठी साडी तसेच युवक वर्गासाठी शर्ट आणि पँट वाटप करण्यात आले. ढोलेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण ही करण्यात आले तसेच प्रतिष्ठानच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक रमेश दोंदे यांच्याकडून शाळेची माहिती घेऊन शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी शिवकन्या प्रतिष्ठानच्या संस्थापिका जिज्ञासा चौधरी, वाडा नगरपंचायतच्या नगरसेविका नयना चौधरी, मीनल चौधरी, आरंभ प्रतिष्ठान रणरागिणी कक्ष जिल्हाध्यक्षा माही चौधरी, आरंभ प्रतिष्ठान तालुका प्रमुख ओंकार कोळी, संपर्कप्रमुख देवेश चौधरी, कुणाल भोईर आणि दिवेश पष्टे उपस्थित होते.
-कुणाल म्हात्रे