कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रसुतीगृह रुग्णालयासमोर एका गरोदर महिलेला तासनतास बसून ठेवल्याचा केविलवाणा प्रकार समोर आला आहे. यंत्रणेचे कारण देत या महिलेस इतर ठिकाणी जाण्याचे सांगितल्याने आरोग्य सुविधांचा वानवा आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वायले नगर येथे प्रसूतिगृह आहे. या प्रसूती गृहामध्ये दूध नाका परिसरामध्ये राहणारी इरफाना शेख या महिलेला प्रसूतीसाठी आणले असता तिची प्रसूती न करताच तिला रुग्णालयाच्या बाहेरच बसून ठेवण्यात आले होते. तुमचा शुगर वाढलेला आहे आमच्याकडे डॉक्टर नाहीत, आय सी यु नाही असे थातुरमातुर कारण सांगून या गरोदर महिलेला ठाणे मुंबईला जाण्याचा अजब सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान कोरोना काळात आधीच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आता आरोग्य सेवा घेताना कुचंबणा केली जात आहे. त्यामुळे महिला आरोग्य विभागात गंभीर कुचंबणा करणाऱ्या डॉक्टरांवर आणि संबंधितांवर कारवाई होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण :- इगतपुरी ते कसारा दरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल (शुक्रवारी) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली आहे.
कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान दोन आरोपीना प्रवाशानी मोठ्या धाडसाने पकडलं. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत दोन जणांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आठ आरोपीमधील सात जण घोटी परिसरात राहतात तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास ही सुरक्षित राहिला नसल्याचे या घटनेवरून समोर येते आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले . एक्स्प्रेस ने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी धाक दाखवून प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले ६ जणांचे पैसे रोकड आणि १० जणांचे मोबाईल व इतर वस्तू हिसकावून घेतल्या. दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी एका प्रवाशा सोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या २० वर्षीय प्रवासी पत्नीची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.
कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख अस या आरोपींच नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे. नशेच्या अमलाखालि त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसाची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.
मध्य रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी घटना घडल्यानंतर आम्ही घटना स्थळ न पाहता कल्याण जीआर मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची प्रकृती स्थिर आहे. आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहेत. तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे मनोज पाटील (रेल्वे डीसीपी) यांनी सांगितले आहे. आमचा तपास योग्य दिशेने सुरू असून उर्वरित आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील. अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
कल्याण : कल्याण पूर्वेत ‘अंतर्राष्ट्रीय अग्रहरि वैश्य’ समाजाच्या वतीने महाराजा ‘श्री अग्रसेन’ यांची ५१४५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि साध्वी सरस्वती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे जवळपास दोन वर्षांनी खासदार शिंदे आणि आमदार गायकवाड हे एकाच मंचावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराजा अग्रसेन यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत सांगितले कि, जे महाराजा अग्रसेन यांनी ५१४५ वर्षे आधी सांगितले होते त्या गोष्टी आज देखील समाजामध्ये लागू होतात. संस्थेचे राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष योगेश अग्रहरी (के. एस. गुप्ता) यांनी सांगितले कि, आम्ही अग्रहरी समाजाचे लोकं महाराजा श्री अग्रसेन यांचे वंशज असून आज त्यांच्या जयंती समारोहात त्यांच्या आठवणींना उजाळा देत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड यांच्यासह कथा वाचक साध्वी सरस्वती, शिवसेना कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटिल, अंतराष्ट्रीय अग्रहरि समाचाचे मुकेश अग्रहरि, दिनेश अग्रहरि आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कल्याण :- कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील गोदरेज हिल भागात क्षुल्लक कारणाने एका तरुणाची हत्या झाली आहे. तीक्ष्ण हत्याराने भोकसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान सदर तरुण मयत झाला. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
खडक पाडा परिसरातील गोदरेज हिल भागात गुरुवारी रात्री १२ ते १ च्या सुमारास दोंघांची रस्त्यात बाचाबाची झाली. शब्दाला शब्द वाढत गेले आणि या बाचाबाचीचे परिवर्तन हाणामारीत झाले. या दरम्यान शेख खान या आरोपीने तीक्ष्ण हत्याराने वार केले. वार जिव्हारी लागल्याने खाजगी रुग्णालयात मुकेश देसाई या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शेख खान या इसमावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खडकपाडा पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन कसोशीने पुढील तपास सुरू केला आहे.