दोन मित्रांकडून Nancy Finance ला ₹३५.६४ लाखांचा गंडा

Nancy Finance : दोन मित्रांनी मिळून ३५ लाख ६४ हजार रुपयांचा नेंन्सी फायनान्सला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्व तिसगाव नाक्यावरील विश्वकर्मा मेडिकलचा सचिन विश्वकर्मा आणि त्याचा मित्र पवनकुमार शुक्ला यांच्यावर कोळसेवाडी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण शहरातील नेंन्सी फायनान्स हिने वैश्विक महामारीच्या काळात आणि त्या अगोदरही छोट्या मोठ्या उद्योजकांना फायनान्स केले. तिसगाव नाक्या जवळील विश्वकर्मा मेडिकल स्टोरचा मालक सचिन विश्वकर्मा यांनी आपल्याला मेडिकल स्टोअर्स रीनोव्हेशन करून औषधे भरायची आहेत असं सांगून काटेमावली नाका येथील मान्यताप्राप्त नेंसी फायनान्स कडून ३६ लाख ६७ हजार ५०० रुपये चेक व रोख असे वेग वेगळ्या पद्धतीने घेतले. त्यातील १८ लाख २८ हजार ५०० रुपये त्याने परतावा केला.

सचिनचा दुसरा मित्र पवन शुक्ला याचे त्याच इमारतीत ड्राय फ्रुटचे दुकान होते. नेंन्सी फायनान्स कडून कोविड काळात १७ लाख २५ हजार रुपये कर्ज घेवून तो सध्या फरार झाला आहे. या दोघां मित्रांनी मिळून नेंन्सी फायनान्सची एकूण ३५ लाख ६४ हजारांची फसवणूक केली असल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून फसवणूक केलेल्या आरोपींना पोलिसांनी नोटीस दिल्याचे समजते.

मात्र लाखोंची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून आरोपी खुलेआम फिरत आहे का? तसेच ‘मै पैसा देगा नही। तुमको जो करना है वो करो।’ असे बोलुन फसवणूक पचवली जातेय का? हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

संतोष दिवाडकर

Nancy Finance defrauded of ₹35.64 lakh by two friends

मनसेच्या चिकणीपाडा जनसंपर्क कार्यालयाचा नूतनीकरण सोहळा संपन्न

कल्याण :- कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा नुतनीकरण सोहळा आज पार पडला. मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयात मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांच्या विध्यमाने शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत आहे. आज कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांच्या मनसे जनसंपर्क कार्यालयाचा नुतनीकरण सोहळा पार पडला. तसेच मनसेचे आमदार राजु पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयात मनसे तसेच आई सामाजिक संस्थेच्या संयुक्त विध्यमाने अल्पदरात शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंतच्या वेळेत हे शिबिर २९ सप्टेंबर पर्यंत सुरू असणार आहे.

यात पेनकार्ड, आधारकार्ड, मतदार कार्ड, हेल्थ कार्ड असे अनेक शासकीय कार्ड निगडित कामे करून देण्यात येत आहेत. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांनी नागरिकांना केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जितेंद्र वाघचौरे तसेच सुवर्णा वाघचौरे प्रभागातील अनेक समस्या सोडवत जन सामान्यांचे प्रश्न मार्गी लावले जातात असल्याचे आई सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा वाघचौरे यांनी सांगितले.

या दरम्यान जिल्हा सचिव संदीप नावगे, विधानसभा अध्यक्ष अनंत गायकवाड, डॉ. सुनील पांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे माजी अध्यक्ष अशोक भोसले, योगिता गायकवाड, सुधा शाहा यांनी उपस्थीती दर्शविली होती. या उपक्रमाचे आयोजन योगेश गव्हाणे मनसे उप शहर अध्यक्ष, जितेंद्र वाघचौरे मनसे उपविभाग अध्यक्ष, सुवर्णा जितेंद्र वाघचौरे आई सामाजिक अध्यक्षा, सहकारि सतिश (आप्पा) साळवी, सागर कोळगे, विशाल वाघचौरे, अमित मोरे, सीमा अहिरे, प्रार्थना वाघचौरे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

संतोष दिवाडकर

https://youtu.be/_A6gsv3k6cY
स्व. आमदार अण्णासाहेब पाटील जयंती निमित्त रुग्णांना फळे वाटप

कल्याण :- महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या वतीने श्रमिकांचे भाग्यविधाते स्व. आमदार अन्नासाहेबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त रुक्मिणी बाई रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली होती. पाहुयात यावर एक स्पेशल रिपार्ट.

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील एका गरीब शेतकर्याचे पैलवान पोरं ते सामान्य हमाल, क्रेन ड्रायवर सामान्यातून असामान्यापर्यंत जाऊन पोहचलेले श्रमिकांचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे म्हणजेच स्व. आमदार अण्णासाहेब पाटील. हमाली करतानाच इतर हमाल कामगारांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले. त्यासाठी कौटुंबिक जीवनाकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. म्हणूनच ते हमाल कामगारांचे आणि शोषित कष्टकरी वर्गाचे दैवत बनले. या निमित्ताने कल्याण मधील माथाडी कामगार सेनेच्या कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

अण्णा साहेबांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त क.डों.म.पा. च्या रुक्मिणीबाई रुग्णालयात जाऊन रुग्णांना तसेच रुग्णांची अहोरात्र देखभाल व सेवा करणाऱ्या डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनाही माथाडी कामगार सेनेच्या वतीने फळे तसेच बिस्किट वाटप करण्यात आले होते.

भारतीय कामगार सेना संलग्न महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या विद्यमाने निलेश अप्पा पराडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणपत बामणे, सयुक्त सरचिटणीस नारायण पाटील, ठाणे जिल्हा चिटणीस विजेंद्र चौधरी, राज्य चिटणीस दिलीप सावंत, जिल्हा चिटणीस अजय बने, सरचिटणीस राजेश महाडिक, रायगड जिल्हा चिटणीस किरण गोरे, शिवसेना शाखाप्रमुख कामोठे गणेश गोरे, कार्यकर्ते नितीन राक्षे, राजेश जाधव, सहचिटणीस सागर पगारे, उपचिटनिस ज्ञानेश्वर मरसाळे, उ.अ.ब. चिटणीस गोरक्षनाथ जाधव, कार्यकर्ते विक्की कांबळे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.

-संतोष दिवाडकर

‘सेंट मेरी’ हायस्कूलला ‘मायक्रोसॉफ्ट शोकेस स्कूल’ प्रमाणपत्र प्राप्त

कल्याण : एक उच्चभ्रू मान्यता जी संपूर्ण भारतातील केवळ 40 शाळांना आणि जगभरातील केवळ 125 शाळांना दिली जाते. त्यात सेंट मेरी हायस्कूल, कल्याण, भारतातील नंबर 1 बजेट स्कूल झाली आहे, 33 वर्षांचा वारसा घेऊन, हायब्रीड लर्निंगला वास्तव बनवून भविष्याकडे वाटचाल करत आहे. 1989 मध्ये त्याच्या सुरुवातीपासून, जेव्हा काही शंभर विद्यार्थी आणि डझनभर वचनबद्ध शिक्षकांसह त्याची स्थापना झाली होती.

या वर्षी सेंट मेरी 33 व्या वर्षात पाऊल टाकत असताना, या खाजगी बजेट स्कूलमधून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर झाले, जीवनाच्या विविध क्षेत्रात टप्पे गाठलेल्या 6,000 पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यां पास आऊट झाले आहे. कृशांक मलिक व भूमिका यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम वर्गखोल्या तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

प्रमुख उपस्थितीत आमदार गणपत गायकवाड, यांनी आपल्या प्रेरक शब्दांनी उपस्थितांना संबोधित केले आणि त्यांची तीनही मुले सेंट मेरी आणि आर्य गुरुकुल शाळेमध्ये शिकले हे आभिमनाने सांगितले.

“सेंट. मेरीज हायस्कूल ही केवळ भारतातील सर्वोत्कृष्ट बजेट शाळा नाही तर जगातील सर्वोत्तम बजेट शाळा बनली आहे. शाळेने जागतिक स्तरावर जाऊन देशातील सर्वोत्कृष्ट शाळांना मागे टाकले आहे”, असे अली सैत यांनी घोषित केले.

या विशेष प्रसंगी डॉ. नीलम मलिक यांनी नीलिटची घोषणाही केली यात सेंट मेरीचा माजी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात चंगल्या पॅकेजचे जॉब मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी जितेश गायकवाड आणि भूषण इंगोले यांनी केले, ज्यांनी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले, तर काही संगीत आणि नृत्याचाही प्रेक्षकांनी आनंद घेतला.

भरत मलिक, संचालक म्हणाले, “प्रत्येक माजी विद्यार्थ्यांसाठी , शाळा आणि समाजासाठी.”
त्यांच्या ओघ शिक्षकांकडे परत येणे, आमच्या समवयस्कांशी जोडणे आणि मैत्रीचे बंध पुन्हा जिवंत करणे ही नेहमीच एक अभिमानाची भावना असते.

संतोष दिवाडकर

Hindi Day : सेंट मेरी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहाने साजरा

Hindi Day : सेंट मेरी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेंट मेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका दिव्या बोरसे उपस्थित होत्या. समन्वयक देवी आणि मंजू मॅडम यांचा कार्यक्रमात सहभाग होता.

कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलांनी सहभाग घेतला. यात पाचवीच्या मुलांनी कथाकथन केले तसेच दोहा वक्तृत्व काव्य स्पर्धेत भाग घेतला. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी कवी, लेखक, गीते यांच्या माध्यमातून कार्यक्रम अतिशय रोमाहर्षक बनवला. कबीर दासजींची कविता ‘कोशीश करने वालों की हार नही होती’ आणि दोहे हिंदी मध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गायले.

राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त शाळेत मान्यवरांचीही भाषणं झाली. कार्यक्रमात हिंदी भारत माँ की गाण्याचे अतिशय सुंदर सादरीकरण सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या केले. इयत्ता सातवीपासून कृष्णा तिवारी यांनी आशनच्या माध्यमातून हिंदीचे महत्त्व समजावून सांगून कार्यक्रमाची शोभा वाढवली. इयत्ता सातवी रामधारी सिंह दिनकरजींची सुंदर कविता पठण केली गेली.

इयत्ता नववी आणि दहावीचे निहाल पाठक, स्वस्तिक तिवारी आणि समिक्षा पांडे यांनी प्रसिद्ध लेखक, कवी आणि कवी हरिवंशराय बच्चन, मुन्शी प्रेमचंद, सुभद्राकुमारी चौहान यांचे चरित्र आणि कविता लिहिल्या. आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती आणि महात्मा गांधीजी यांचे हिंदी दिवसाच्या प्रचारात मोठे योगदान कसे होते, हे सांगून पूजा पांडे शिक्षिकेने कार्यक्रमाची सांगता केली.

जसे आपण भाषा, प्रांत, जातीच्या बंधनात जखडलेले आहोत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान देश-विदेशात आपले भाषण देतात. तशी भाषणे फक्त हिंदीत द्या असे सांगून वातावरणात उत्साह संचारला. हिंदी शिक्षिका सिमा चौहान यांनी, समाजाचे उद्योगपती राजेंद्र सिंग (एक प्रसिद्ध हिंदी साहित्यिक) यांनी हिंदीला भारताची अधिकृत भाषा बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि संपूर्ण जगात हिंदी भाषेचा सन्मान करण्यासाठी कविता सादर करण्यात सर्वात मोठे योगदान आहे असे सांगितले.

संतोष दिवाडकर

National Hindi Day celebrated in St. Mary’s High School

Foxconn Vedanta Semiconductor Project म्हणजे नेमकं काय ?

Foxconn Vedanta : महाराष्ट्रात होणारा सेमीकंडक्टर प्रकल्प आता गुजरातला नेण्यात येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार होती. मावळ तालुक्यातील तळेगाव येथे होणारा हा १ लाख ५८ हजार कोटींचा भला मोठा प्रकल्प आता गुजरातला होणार असल्याचे जाहीर होताच शिंदे भाजप सरकारवर प्रश्नचिन्ह उमटवले जात आहेत.

फॉक्सकॉन ही तैवान देशातील एक इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे तर वेदांता ही भारतीय कंपनी. या दोन्ही समूहांनी मिळून भारतात प्रथमच सेमीकंडक्टर प्लांट उभारायचे ठरवले आहे. सेमीकंडक्टर ही एक मायक्रोचिप आहे जी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जाते. ज्याकरिता भारताला आजवर चीन वर अवलंबून रहावे लागत होते. ही बाब भारतासाठी गौरवास्पद असून यानंतर लॅपटॉप, टेबलेट, स्मार्टफोन अशा काही उपकरणांच्या किंमती भारतीय बाजारात कमी होण्याची देखील शक्यता आहे.

गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यात हजार एकर जागेवर हा प्रकल्प येत्या दोन वर्षांत उभा राहणार असून त्यानंतर चिप निर्मितीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी गुजरात सरकारशी करारबद्ध होत असताना दिली. यासाठी ६०-४० अशी दोन्ही कंपन्यांची या प्रकल्पात भागेदारी असणार आहे.

भारताचा हा एक मोठा प्रकल्प असून तो महाराष्ट्राच्या मावळ तालुक्यातील तळेगाव येथील एमआयडीसी क्षेत्रात होण्याची तयारी सुरू होती असं महाविकास आघाडी कडून सांगितले जात आहे. मात्र असे असताना हा प्रकल्प गुजरातला कसा काय जातो ? असे सवाल राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील शिंदे भाजप सरकारवर टिका केली आहे. तर प्रकल्पातून महाराष्ट्रात रोजगार निर्मिती होणार होती. हा प्रकल्प गुजरातला कसा काय नेला याची चौकशी केली जावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील केली आहे.

आम्ही त्यांना अकराशे एकर जमीन दिली होती मात्र मागील दोन वर्षे आधीच्या सरकार कडून त्यांना योग्य रिस्पॉन्स मिळत नसेल असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. तर हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

-संतोष दिवाडकर

What exactly is the Foxconn-Vedanta Semiconductor Project? in marathi

Kalyan Murder : नशेसाठी पैसे न दिल्याने आईची हत्या करून लटकवले फासावर

Kalyan Murder : नशेच्या अतिरेकामुळे जन्मदात्या आईवडिलांची हत्या करण्यास धजावत आहेत याचा प्रत्यय कल्याण पूर्वेतील आला आहे. नशेबाज मुलाने आईकडून पैसे मागितले. आई पैसे देण्यास नकार दिला. मुलाने गळा आवळून आईची हत्या केली. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे हे दाखविण्यासाठी त्याने आईचा मृतदेह घरात लटकवून ठेवला. पोस्टमार्टम रिपोर्टच्या खुलाशानंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी आईची हत्या करणारा मुलगा रवी पुमणी याला अटक केली आहे.

कल्याण पूर्व भागात हनुमाननगर परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दिगंबर पवार यांना एक माहिती मिळाली. या माहितीनुसार हनुमाननगर परिसरात एका घरात एका ६४वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिगंबर पवार आणि महिला पोलीस अधिकारी निशा चव्हाण यांनी या आत्महत्येच्या घटनेचा तपास सुरु केला. मृत महिलेचे नाव सरोजा पुमणी होते. पोलिसांनी सरोजा यांचा मृतदेह पोस्र्टमार्टमसाठी पाठविला.

घरात सरोजा व त्यांचा ३४ वर्षीय मुलगा रवी पुमणी राहत होते. पोस्टमार्टमनंतर डॉक्टरांनी दिलेला अहवाल पाहून पोलिस हैराण झाले. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळ मुलगा रवी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यानंतर जे वास्तव समोर आले ते धक्कादायक होते. मुलगा रवी हा नशेबाज आहे. नशा करण्यासाठी आईकडून वारंवार पैसे मागायचा. त्यासाठी आईसोबत तो भांडण करायचा. सोमवारी रात्री आई मुलात जोरदार भांडण झाले. या रवीला दुखापत झाली. रवीने गळा आवळून आईची हत्या केली. ते लपविण्यासाठी रवीने आईचा मृतदेह घरात लटकविला. आईने आत्महत्या केल्याचे भासविले. मात्र कोळसेवाडी पोलिसांच्या सखोल तपासाअंती ही हत्या उघडकीस आली आहे.

-रोशन उबाळे

Kalyan Murder : Mother was killed and hanged for not paying for drugs

Arya Gurukul : आर्यग्लोबलने शिक्षक दिनी ‘सेल्फ-केअर’ वर केले लक्ष केंद्रित

Arya Gurukul : आर्य गुरुकुल अंबरनाथ येथे २ वर्षांच्या ऑनलाइन कार्यक्रमांनंतर आयोजित केलेल्या अनोख्या शिक्षक दिनाच्या सोहळ्याने शिक्षकांना त्यांच्या बाह्य स्वरूपाची काळजी घेण्यासाठी आणि संपूर्ण शारीरिक आरोग्य राखण्यासाठी अंतर्दृष्टीपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमाला आर्य गुरुकुल अंबरनाथ, नांदिवली, सेंट मेरीज हायस्कूल कल्याण आणि लिटल आर्यन प्री.के. यांचा समावेश होता.

शिक्षक दिवसाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आर्यग्लोबलने नेत्रदीपक सत्र आयोजित केले होते. वैष्णवी शूर, प्रतिमा सल्लागार. तिने शिक्षकांना त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी योग्य टिप्स दिल्या. “शिक्षक हे समाजाचा चेहरा आहेत आणि मुलांसाठी आदर्श आहेत, म्हणून त्यांनी स्वतःची वेषभूषा आणि स्वतःचे आचरण यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. मुलांनी त्यांच्या शिक्षकांना सुंदर पोशाख केलेले पाहणे आणि आत्मविश्वासाने दिसणे महत्वाचे आहे जेणेकरून ते त्यांचे अनुकरण करू शकतील असे मिस शूर म्हणाल्या. पुढे आपल्या महत्वाच्या माहिती भाषणात डॉ. फिजिओथेरपिस्ट लीना धांडे यांनी शारीरिक मुद्रा चांगली ठेवण्याबाबत माहिती दिली.

मुद्रा-प्रेरित वेदना आणि वेदनांची तक्रार आणि शिक्षकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ते बरेच तास बसले होते आणि अनेकदा चुकीच्या पवित्रा किंवा अस्वस्थ आसनांचा वापर करत होते. डॉ. धांडे यांनी ‘एर्गोनॉमिक्स’कडे लक्ष देण्यावर अत्यंत आवश्यक प्रकाश टाकला आणि काही सोप्या व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखवले जे ते दिवसा करू शकतात.

“आत्मविश्वास दिसण्यासाठी आरोग्य आणि निरोगीपणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. चांगली मुद्रा ठेवल्याने केवळ आत्मविश्वासच दिसत नाही तर शारीरिक व्याधींपासून दूर राहण्याची खात्रीही मिळते”, डॉ. धांडे यांनी पुढे जाऊन आश्वासन दिले आहे की पालक आणि मुले दोघांसाठीही समान कार्यशाळा आयोजित केली जाऊ शकते, कारण ते देखील साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत.

कार्यक्रमासाठी निमंत्रित विशेष पाहुणे डॉ. हरिपाल सोनवत, माजी शास्त्रज्ञ, टीआयएफआर; डॉ. रीता सोनवत, माजी डीन आणि एचओडी मानव विकास, एसएनडीटी महिला विद्यापीठ; स्वामिनी निष्कलानंद, आचार्य चिन्मय मिशन, कल्याण. एज्युकेशन टुडे फाउंडेशनचे अध्यक्ष भरत मलिक, निलेश राठोर मुख्याध्यापक आर्य गुरुकुल अंबरनाथ, राधामणी अय्यर प्राचार्य आर्य गुरुकुल नांदिवली, दिव्या बोरसे प्राचार्य सेंट मेरीज हायस्कूल आणि लिटल आर्यनचे केंद्रप्रमुख प्री-के.

हा कार्यक्रम शिक्षकांनी शिक्षकांसाठी आयोजित केला होता. नृत्य आणि संगीत विभागांच्या तर्फे विनोदी सादरीकरण झाले. एका विशेष स्किटमध्ये शिक्षकाच्या जीवनातील अनेक पैलूंचे चित्रण करण्यात आले होते. मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात असे व्यक्त केले की शिकवणे हे व्यवसायापेक्षा बरेच काही आहे आणि याचा अर्थ जीवन जोपासणे, विश्वास निर्माण करणे आणि आयुष्यभर शिकत राहणे.

ईटीएफचे अध्यक्ष भरत मलिक म्हणाले, “आमच्या प्रणालीतील सर्वात महत्त्वाचे भागधारक हे मुले, पालक आणि गुरु आहेत. गुरू हे असे आहेत जे मुलाच्या मनावर खूप प्रभाव पाडतात आणि म्हणूनच त्यांनी मुलावर लक्ष केंद्रित करून स्वतःवर कार्य केले पाहिजे.” ‘हॅपी चाइल्ड हॅपी नेशन’ हे शाळेचे ब्रीदवाक्य आणि ‘हॅपी चाइल्ड’ तयार करण्यात शिक्षकांची भूमिका त्यांनी सांगितली. त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनाही श्रद्धांजली वाहिली, ज्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

आर्यग्लोबलचा विश्वास आहे की त्यांचे शिक्षक भविष्यातील मनांना आकार देण्यासाठी सक्षम आणि सुसज्ज असले पाहिजेत. म्हणून, ते शिक्षकांसाठी वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित करतात. जसे की शिक्षक शिक्षण सत्र, प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास आणि सक्षमता निर्माण कार्यक्रम, वार्षिक पुनरावलोकन आणि नियोजन बैठक. यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळते आणि शिक्षणातील नवीनतम माहिती मिळते. सध्या, आर्याग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल्सचे सर्व शिक्षक मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर प्रमाणित आहेत आणि शिकवताना तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये तज्ञ आहेत.

जे भविष्याची मने घडवतात, जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात आणि मुलांना यशस्वी जीवन जगण्यासाठी ज्ञानाने सुसज्ज करतात ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. शिक्षक दिन हा असाच एक प्रसंग. आर्याग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल्सने त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी त्यांच्या शिक्षकांसाठी आनंद, आणि स्वत: ची काळजी यांनी भरलेल्या निवांत दिवसाचा आनंद घेण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करून घेतली. या कार्यक्रमाची सांगता शिक्षकांना देण्यात आलेल्या या दिवसाचा आनंद लुटणार्‍या शिक्षकांसाठी देण्यात आलेल्या मनमुराद भोजनाने झाली.

-संतोष दिवाडकर

Arya Gurukul : AryaGlobal focuses on ‘Self-Care’ on Teachers’ Day