स्वातंत्र्यदिनी कल्याण डोंबिवली महापालिकेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेचा विसर पडल्याची नाराजी दर्शवित पालिका आवारात कचरा टाकून वंचित बहुजन आघाडीने याचा निषेध व्यक्त केला आहे.
रविवारी भारताचा स्वांतत्र्य दिवस संपुर्ण देश साजरा केला जात आसताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली मुख्यालयाच्या आवारात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. परंतु कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने स्मारकाची स्वच्छता न केल्याने पालिका प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली शहर पूर्व अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी महानगरपालिकेच्या आवारात कचरा टाकून जाहीर निषेध व्यक्त केला.
-कुणाल म्हात्रे
