कल्याण :- कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील गोदरेज हिल भागात क्षुल्लक कारणाने एका तरुणाची हत्या झाली आहे. तीक्ष्ण हत्याराने भोकसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान सदर तरुण मयत झाला. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
खडक पाडा परिसरातील गोदरेज हिल भागात गुरुवारी रात्री १२ ते १ च्या सुमारास दोंघांची रस्त्यात बाचाबाची झाली. शब्दाला शब्द वाढत गेले आणि या बाचाबाचीचे परिवर्तन हाणामारीत झाले. या दरम्यान शेख खान या आरोपीने तीक्ष्ण हत्याराने वार केले. वार जिव्हारी लागल्याने खाजगी रुग्णालयात मुकेश देसाई या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शेख खान या इसमावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खडकपाडा पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन कसोशीने पुढील तपास सुरू केला आहे.
-रोशन उबाळे
