कल्याण :- राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १ डिसेंबर पासून सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या संदर्भात केडीएमसीच्या शालेय समितीची बैठक केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. नवीन येणाऱ्या व्हेरीयंटचा अंदाज घेऊन नियोजन करता येईल असे प्रशासनाचे धोरण असू शकते.
या बैठकीत सध्याच्या परिस्थितीतील कोविड -१९ प्रादुर्भाव व जागतिक पातळीवर आलेला कोविड -१९ चा नवीन व्हेरीयंट ओमीक्रोनचा वाढता प्रसार यावर चर्चा करण्यात आली. कोविड -१९ चा व्हेरीयंट ओमीक्रोनचा वाढता प्रसार लक्षात घेता कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर पासून सुरु न करता १५ डिसेंबर २०२१ पर्येंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान १५ डिसेंबर नंतर कोविड-१९ ओमीक्रोनच्या प्रसाराबाबतची त्या वेळची स्थिती लक्ष्यात घेउन समितीचे पुन्हा बैठक घेऊन पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करायचे कि नाही हे ठरविण्यात येईल असा निर्णय सुद्धा झालेल्या या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे तूर्तास कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा ह्या १५ डिसेंबर पर्येंत बंद राहतील हे स्पष्ट झाले आहे.
-रोशन उबाळे
Can a proper letter be posted, regarding the above changes?