कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याणमध्ये ३२ नागरिकांचे गहाळ फोन पोलिसांनी दिले शोधून

कल्याण : कल्याण मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या ३२ मोबाईलचा शोध घेवुन नागरिकांचे गहाळ झालेले ४ लाख ५० हजार किमतींचे मोबाईल परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, कल्याण यांच्या अंतर्गत असलेली महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणाऱ्या लोकांचे सन २०१९, २०२०, २०२१ या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबधीत पोलीस ठाण्यात प्रॉपटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या हरविलेल्या मोबाईलचा तात्रींक माहितीच्या आधारे शोध घेणे बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिलेल्या योग्य त्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अधिन असलेल्या वाहन व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि एच.जी ओऊळकर, पोहवा पवार, पोना गायकवाड, वाघ, वळवी, पोशि चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन अंदाजे एकुण ४ लाख ५० हजार  किंमतीच्या ३२ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन हे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत.

दरम्यान आपले गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या प्रती असलेला विश्वास आणखी दृढ झाला असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. (Kalyan Crime)

-कुणाल म्हात्रे

About Author

One thought on “कल्याणमध्ये ३२ नागरिकांचे गहाळ फोन पोलिसांनी दिले शोधून

  1. मी सुध्दा 2021 मध्ये माझा फोन गहाळ झाल्याची तक्रार रीतसर नोंदवली असुन मा. अपर पोलीस आयुक्त दत्ता साहेब यांना विनंती करतो की, उर्वरित मोबाईल सुध्दा परत मिळवून द्यावे, त्रयस्थ नागरिक म्हणून मी विनंती करतो, खुप आभारी असेल अजून ज्यांचे फोन मिळाले नाहीत त्यांचा वतीने.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *