Maratha Morcha : मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात कल्याणच्या शासकीय विश्राम गृहात नुकतीच बैठक पार पडली. मंगळवारी सकाळी १० वाजता कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून ५० टक्क्यांच्या आतील मराठा आरक्षण ओबीसी मधून, इडब्ल्यूएस आरक्षण, शासकीय सेवेमधील विद्यार्थ्यांना नियुक्तीचा अडचणीबाबत, सारथी संस्थेमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा प्रश्न व इतर मागण्यांसाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, दिवा, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, कर्जत, कसारा, मुरबाडसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-कुणाल म्हात्रे
Maratha Morcha: Maratha Janakrosh Morcha in Kalyan on Tuesday