घडामोडी

Maval News : चौदा वर्षीय मुलगा शंभू ठाकर हरवल्याने तालुक्यात उडाली होती खळबळ

Maval News : मावळ तालुक्यात आज दिवसभर एक व्हॉट्सऍप स्टेटस पहायला मिळत होता. तो म्हणजे शंभू ठाकर हरवला आहे सापडल्यास संपर्क करावा. जवळपास संपूर्ण तालुक्यात या स्टेटसने शंभूला व्हायरल केले होते. चिंतेत असलेल्या मावळ तालुक्याने संध्याकाळी मोकळा श्वास घेतला तो म्हणजे शंभू पुन्हा सुखरूप घरी परतल्याच्या बातमीने.

मावळ तालुक्यातील येळसे गावातील शंभू गणेश ठाकर हा नववीत शिकणारा १४ वर्षीय मुलगा सकाळीच रागाने घर सोडून निघून गेला होता. अभ्यासावरून वडिलांनी खडसावले म्हणून शंभूने हे पाऊल उचलल्याचे समजते. शंभूला रागावून त्याचे वडील गणेश ठाकर हे एका विधी कार्यासाठी घरातून बाहेर पडले. आणि त्यापाठोपाठच एक दुचाकी वाहन घेऊन शंभू देखील बाहेर पडला. ही माहिती समजल्यानंतर शंभूचे कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकरी चिंतेत आले आणि लगोलग शोधमोहीम सुरू झाली.

तळेगाव मध्ये शाळेत शिकत असलेला शंभू दुचाकी घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला असल्याचे लोणावळा येथील वर्सोली टोलनाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आले होते. यानंतर मात्र संपूर्ण तालुक्यात समाज माध्यमांच्या माध्यमातून शंभूची शोधमोहीम सुरू झाली होती. सकाळी पावणे दहा वाजता तो टोलनाका सोडून पुढे गेला असल्याने तो कदाचित कल्याण, ठाणे, मुंबई, नवी मुंबई भागात जाऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

दुपार नंतर सदर माहिती मुंबई भागात देखील पोहोचू लागली होती. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी बराच शोध घेतल्यानंतर तो त्यांना लोणावळा येथे मिळून आला. त्याच्याकडे विचारणा केली असता तो लोणावळ्यातच फिरत असल्याचे त्याने सांगितले. यानंतर मात्र शंभूला सुखरूपपणे घरी आणले आणि त्याच्या कुटुंबियांसह संपूर्ण तालुक्याने समाधानकारक निश्वास टाकला.

संतोष दिवाडकर

Maval News : Concern spread in Maval due to the missing of fourteen-year-old boy Shambhu Thakar

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *