कल्याण-डोंबिवली घडामोडी

पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने कोसळली सुरक्षा भिंत; लोकांच्या घरात चिखलाचे साम्राज्य

कल्याण : बुधवारी दुपारच्या दरम्यान कल्याणमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साठण्याच्या तसेच पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात गॅस कंपनीच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत पावसाच्या प्रचंड प्रवाहाने कोसळून बाजुला असलेल्या रहिवाश्यांच्या घरात पाणी घुसून काही प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

सुमारे ३० वर्ष जुनी असलेल्या मनिष गॅस कंपनीच्या गोडाउनच्या सुरक्षा भिंतीला अचानक पणे पडलेल्या प्रचंड अशा पावसाच्या पाण्याचा प्रवाह असह्य झाल्याने हि भिंत कोसळल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांच्या घरात पाणी आणि चिखल घुसल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. अगदी कमी वेळात हा हाहाकार माजल्याने नागरिक देखील गोंधळून गेले होते.

आज सकाळपासून तहसीलदार व तलाठी कार्यलयामार्फत याठिकाणी पंचनामे करण्यात आले असून त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार लवकरात लवकर नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्तां कडून केली जात आहे.

संतोष दिवाडकर

The security wall collapsed due to the flow of rain water

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *