कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू ठेवली असुन मनपा दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत असूनही अजून काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालता फिरत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात घराबाहेर विना मास्क फिरणा-या ४८४५ व्यक्तींकडून मनपा कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने तब्बल २२ लाख ९३ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे.
नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी अथवा गर्दीच्या ठिकाणी वावरतांना मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना नियमावलीचे पालन होणे बाबत प्रशासन कठोर अमंलबजावणी करीत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई चा बडगा उचलीत दंडात्मक कारवाई प्रभावीपणे राबवित आहे.
-कुणाल म्हात्रे