कल्याण डोंबिवली महापलिका परिसरातील जे प्रभाग क्षेत्रातील कर्पेवाडी येथील द्वारका शाळा ही इमारत ३० वर्षापूर्वीची असून या इमारतीतील शाळा गेल्या १० वर्षापासून बंद आहे. हि इमारत जीर्ण झालेली आहे, या इमारतीत गर्दुले व समाज कंटक बसत असून त्यांचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याबाबतच्या तक्रारी केडीएमसीकडे प्राप्त झाल्या होत्या.
या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीट नुसार ही इमारत अतिधोकादायक असल्यामुळे या शाळा इमारतीच्या मालकांस नोटीस बजावून इमारत निष्कासीत करणेबाबत कळवूनही संबंधितांनी ही इमारत निष्कासीत केली नाही. यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानूसार व विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रभागक्षेञ अधिकारी वसंत भोंगाडे यांनी जे प्रभागातील अतिक्रमण निमुर्लन पथक, महापालिका पोलिस व कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच उपअभियंता सुनिल वैदय, कनिष्ठ अभियंता धर्मेद्र गोसावी यांच्या मदतीने व 1 जेसीबी, 1 ब्रेकर,1 गॅस कटरचा वापर करून काल दिवसभर सदर धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई केली असून आज हि कारवाई पूर्ण करण्यात आली.
-कुणाल म्हात्रे