कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला मिळालेल्या कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कल्याण मधील विविध व्यापारी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत नागरी सत्कार केला.
भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत, भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आज देखील अशाच प्रकारे कल्याण मधील विविध व्यापारी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, राजकीय सामाजिक संघटनांनी एकत्र येत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी, मुथा कॉलेज चेअरमन, ज्वेलर्स असो अध्यक्ष प्रकाश मुथा, माजी नगरसेवक तथा अग्रवाल कॉलेज व्हॉईस चेअरमन ओमप्रकाश पांडे, माजी नगरसेवक इफ्तेकार खान, कल्याण शहर काँग्रेस ओबीसी अध्यक्ष तथा खवा व्यापारी संघटना सचिव जयदीप सानप, डॉ गिरीश लटके, कपडा व्यापारी असो. हशुभाई शाह, ज्वेलर्स असो वीरेंद्र मुथा, मुथा कॉलेज मुख्याध्यापिका साधना गाधिया, दिपाली मॅडम, स्याम्युल चार्ल्स, महेन्द्र शंकलेशा, जयंतीला शंककलेशा, जयराज सर, किशोर खराटे, राजा सुदाम जाधव केबल व्यावसायिक उपस्थित होते.
संपूर्ण देशाची कोरोना परिस्थिती कशी आहे, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची कोरोना स्थिती कशी होती हे सर्वाना माहिती असून अशा परिस्थितीत केडीएमसी आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगले काम केलं असून त्याबद्दल भारत सरकारच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे. हि अभिनंदनाची बाब असून त्याबद्दल आम्ही हा नागरी सत्कार केला असल्याची प्रतिक्रिया प्रकाश मुथा यांनी दिली.
-कुणाल म्हात्रे