कल्याण-डोंबिवली घडामोडी

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर पण गुन्ह्यात सामील असलेल्या इतरांचे काय? राजेश दाखिनकर यांचा सवाल

अक्षय शिंदे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले. शिवसेनेकडून राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर विरोधकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखिल भारतीय सेनेचे पक्ष प्रमुख अरुण गवळी उर्फ डॅडी यांचे विश्वासू खंदे समर्थक अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख राजेश दाखिनकर यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल त्यांनी सत्ताधारी तसेच विरोधक दोघांवरही सवाल उपस्थित केले आहेत.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्या चिमुरड्या मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे यावेळी राजेश दाखिनकर म्हणाले. जो माणूस मुलींवर अत्याचार करतो त्याची बाजू कोण कशी घेऊ शकतो? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे. त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात ज्या शाळेत हा प्रकार घडला ते संस्थाचालक राजकीय पक्षाशी संलग्न असून ते सध्या फरार आहेत. त्यांना आतापर्यंत अटक होऊन त्यांच्यावर कारवाई का झाली नाही याचे उत्तर गृहमंत्री व राज्य सरकारने जनतेला द्यायला हवे. शाळेतील पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेले आहे. त्यामुळे या घटनेत आणखीन समाविष्ट असलेल्या इतर व्यक्तींनाही कडक शासन व्हायला हवे अशी प्रतिक्रिया राजेश दाखिनकर यांनी एमएच मराठीला दिली आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत अशाप्रकारचे अत्याचार लहान मुलींवर किंवा महिलांवर कधी झाले नव्हते. महिला आणि मुली महाराष्ट्रात पूर्णपणे सुरक्षित होत्या. परंतु अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात मग सरकार कोणाचेही असो, महिला सुरक्षेबाबत उदासीनता नेहमीच दिसून आली आहे. ‘शक्ती कायदा’ जो महाराष्ट्राच्या दोन्ही सदनात पास झाला आहे. त्याला अद्यापही दिल्लीतून मंजुरी मिळालेली नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही अखिल भारतीय सेनेतर्फे करतच आहोत. परंतु इतर राजकीय पक्षांनी याबाबत महाराष्ट्राच्या दोन्ही सदनांमध्ये सरकारला जाब का विचारला नाही, याचा विचार कोणी केला आहे का? की फक्त महिलांवर अत्याचार झाल्यावर त्याचे राजकारणच करत बसणार आहेत?

डोंबिवलीत घडलेल्या घटनेत आम्ही महिलांवरील अत्याचारासंदर्भात ‘शरिया’ सारखे कायदे महाराष्ट्रात लागू झाले पाहिजेत, तरच अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा बसेल, असे स्पष्ट मत मांडले होते. राज्य शासनाने कठोर पावले उचललीच पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला पुरा’ होईल.

– राजेश दाखिनकर
(ठाणे जिल्हा प्रमुख, अखिल भारतीय सेना)

Akshay Shinde’s encounter but what about others involved in the crime? Question by Rajesh Dakhinkar

About Author

2 thoughts on “अक्षय शिंदेचा एन्काऊंटर पण गुन्ह्यात सामील असलेल्या इतरांचे काय? राजेश दाखिनकर यांचा सवाल

  1. बरोबर आहे. जस अक्षय शिंदे ला शिक्षा मिळाली. तसेच या गुन्ह्य़ात सामील सगळ्यानाच शिक्षा झाली पाहिजे. या गुन्ह्यात सामील सार्‍यांचा अटक करा.. अणि असे गुन्हे करणार्‍या प्रत्येकाला अशी शिक्षा द्या तेव्हा कुठे अश्या गुन्ह्यांना आळा बसेल…

  2. बिलकुल सही हैं अपराधी को उसके अपराध का दंड मिलना चाहिए,,, और इस अपराध का इससे बेहतर कोई दंड नहीं,, होगा सकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *