कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण शहरात जल्लोषात सुरू झाला ‘कल्याण महोत्सव’

Kalyan Mahotsav : मातोश्री गुंजाई फाउंडेशन आणि आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने तिसगाव येथील गांवदेवी मंदिराच्या प्रांगणात काल पासून कल्याण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. महोत्सवाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात करण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शविली.

ऐतिहासिक कल्याण शहराची संस्कृती जपणारा महोत्सव म्हणून कल्याण महोत्सव साजरा केला जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. १२ मार्च ते १६ मार्च पर्यंत कल्याण पूर्व तिसगाव गांवदेवी मंदिर मैदानात हा महोत्सव सुरू असणार आहे. लकी ड्रॉ मार्फत दररोज महिला व युवतींसाठी साड्या तसेच ड्रेसपीस बक्षीस स्वरूपात देण्यात येत आहे. महोत्सवात भजन, कीर्तन, पोवाडे, मंगळागौरी, होम मिनिस्टर, ऑर्केस्ट्रा तसेच कुस्तीचे सामने असे विविध सांस्कृतिक उपक्रम पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर खवय्यांसाठी खाणपानाचे स्टोल व इतर वस्तूंचे स्टोल देखील आहेत. लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी एम्युजमेंट पार्क देखील बनवण्यात आला आहे. तसेच या महोत्सवात दररोज सेलिब्रिटिंच्या भेटी देखील होणार आहेत.

कल्याण महोत्सवाची प्रमुख कार्यकारिणी : दिलीप दाखिनकर (अध्यक्ष), महेश गायकवाड (आधारस्तंभ), संजय गुजर (कार्याध्यक्ष), प्रशांत बोटे (उपाध्यक्ष), प्रतीक महिले (सल्लागार), अस्मिता माने (सचिव), निलेश सावंत (सहसचिव), संदीप भालेकर (सहसचिव), अजित चौघुले (खजिनदार), वैशाली ठाकूर (सहखजिनदार), सुगंधा चव्हाण (सहखजिनदार), रवींद्र उतेकर (प्रसिद्धी प्रमुख).

-संतोष दिवाडकर

Web Title : Kalyan Mahotsav starts in Kalyan city

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *