कल्याण :- राष्ट्रवादी कॉंगेसच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १६ जून दरम्यान वर्धापन दिन सप्ताह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जात असून या दरम्यान विरोधी पक्षाकडून ओबीसी आरक्षणाबाबत पसरवल्या जाणार्या चुकीच्या माहितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत बोलताना आप्पा शिंदे यांनी अप्रत्यक्ष स्वबळाचा नारा दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्राचे ओबीसी आरक्षण नाकारले गेले असून मध्यप्रदेशला मात्र ओबीसी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्रला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. पुढे याबाबत बोलताना शिंदे यांनी पक्षपातळीवर महाविकास आघाडी होईल असे संकेत आहेत. मात्र स्थानिक महानगर पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इच्छुक असतात अशावेळी आघाडी झाल्यास कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असल्यानेच पालिका निवडणुका KDMC Election स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतरच आघाडीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नसताना महापालिका निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षण वगळून होत असल्या तरी येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकीट वाटप २७ टक्के ओबीसी आरक्षण गृहीत धरूनच केले जाणार असल्याचे माजी आमदार व कल्याण डोंबवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.
-रोशन उबाळे