कल्याण-डोंबिवली घडामोडी

MNS Exit Poll 2024 : आता एक आमदार नाही तर मनसे गाठू शकते पुन्हा डबल फिगर

MNS Exit Poll 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाल्यानंतरची मनसेची ही चौथी विधानसभा निवडणुक आहे. युती आघाड्यांना आवाहन देऊन मनसेने पहिल्याच लाटेत आपले १३ आमदार निवडून आणून विरोधी पक्षांना घाम फोडला होता. मात्र त्यानंतर पुढील विधानसभेत मनसेला फक्त एक आमदार निवडून आणता आला होता. बाकी मनसेच्या १३ आमदारांपैकी काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर काही आमदार पराभूत झाले. जुन्नर विधानसभा क्षेत्रात शरद सोनवणे हे मनसेचे २०१४ चे एकमेव आमदार ठरले होते. परंतु त्यांनीही पुढे पक्ष सोडला.

मोदी लाटेचा फटका मनसेला बसल्यानंतर मनसेने २०१९ ची निवडणूक मोदीं विरोधात उतरून लढली होती. मात्र मनसेच्या हाती शेवटी तोच निकाल आला आणि यावेळेस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातुन राजू पाटील यांना एकमेव आमदार होण्याचा मान मिळाला. यानंतर कोरोनामुळे ग्रामपंचायत वगळता कोणत्याही निवडणुका महाराष्ट्रात पार पडल्या नाहीत. मात्र याच पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली.

मनसेने मागील दोन वेळेस फक्त खाते उघडले होते. मात्र आता मनसे २००९ प्रमाणे पुन्हा एकदा दुहेरी आकडा गाठू शकते असा अंदाज काही राजकीय विश्लेषक बांधून आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यातील पक्षांची बदललेली समीकरणे. दोन प्रमुख पक्षांचे झालेले दोन गट हे मनसेचा फायद्यात उतरण्याची शक्यता आहे. यंदाची निवडणूक सर्व पक्षांनी युती आघाडीमध्ये न लढवता स्वतंत्रपणे लढवली असती तर मनसेचा आकडा आणखीन मोठा ठरू शकला असता. परंतु आताही मनसेला राज्यातील पक्ष फुटीचा काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे. कदाचित युती आघाडीत बरोबरीची लढाई झाली तर सत्ता स्थापने साठी मनसे किंगमेकरही ठरू शकते. मात्र शेवटचा कल हाती येण्यासाठी २३ नोव्हेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

MNS Exit Poll 2024 : This time MNS can reach double figure again

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *