Kalyan Rape Case : तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात नव्या कलमांची वाढ

Kalyan Rape Case : मागील दीड वर्षापासून एका विद्यार्थीनिवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली होती. आपल्यावर होत असलेले अत्याचार ती विद्यार्थीनी बराच काळ सहन करीत होती. अखेर संयमाचा बांध फुटल्याने पिडीताने तिच्या राहत्या घराच्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि आय टी कलमे लावण्यात आली आहेत. कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात आठवड्याभरापूर्वी एका अल्पवयीन विद्यार्थीनीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल करुन तपास सुरु केला. विद्यार्थीनीच्या मोबाईलमधील नोटपॅडवर तिने तिची व्यथा मांडली होती. बारावीत ७१ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालेली विद्यार्थीनी एफवायच्या वर्गात प्रवेश घेणार होती मात्र त्यापूर्वीच तिने आत्महत्या केली. तिच्या मोबाईलमधील नोटपॅडमध्ये तिच्यासोबत लैगिंक अत्याचार करण्यात आल्याचे तिने नमूद केले होते. मागील दीड वर्षापासून हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी या प्रकरणात तपासाचे चक्र फिरविले आणि या प्रकरणी सात आरोपींना बेडया ठोकल्या आहेत. विजय यादव, प्रमय तिवारी, सनी पांडे, शिवम पांडे, कृष्णा जायस्वाल, आनंद पांडे, निखिल मिश्रा या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर काजल जैयस्वाल या मुलीचा देखील या प्रकरणात समावेश असल्याने तिला देखील तत्काळ ताब्यात घेण्यात आले.

विद्यार्थीनीचे एका तरुणा सोबत प्रेमसंबंध होते. यातच तरुणासोबत फोटो व व्हिडिओ काढण्यात आले होते. त्यानंतर पीडितेला सातत्याने इतर तरुण ब्लॅकमेल करत होते. धक्कादायक बाब म्हणजे तिची मैत्रीण सुद्धा आरोपी तरुणासमवेत तिला ब्लॅकमेल करत होती. अशी धक्कादायक घटना घडल्याने कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली आहे. या घटनेची व्यापकता आणि घृणास्पद कृत्य यामुळे राजकीय आणि सामाजिक संघटनांनी देखील मोर्चे काढून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

प्रकरणातील नवे अपडेट्स : दरम्यान बशीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास सुरू ठेवला आणि आता संबधित आरोपींच्या कलमात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी सामूहिक बलात्कार तसेच आय टी सेक्शन अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. पिडितेच्याआई वडिलांचा आरोप आहे की, आरोपी हे धनाढ्य कुटुंबातील आहे. त्यांच्याकडून आमच्यावर दबाब आणला जात आहे. पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवली पाहिजे. यानंतर पोलिसांनी या कुटुंबाला आता संरक्षण दिले आहे. सोमवारी कल्याण सत्र न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आठ आरोपींना आणखीन तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. तसेच कोळसेवाडी पोलिसांनी तपासाची गती ही आणखीन वेगाने वाढवली आहे.

-रोशन उबाळे

Kalyan Rape Case: Addition of new sections in gang rape case

Kalyan Crime : लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Kalyan Crime : सामूहिक लैंगिक अत्याचार, अत्याचाराचे चित्रीकरण आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या सर्व जाचाला कंटाळून कल्याण मध्ये एका तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना रविवारी घडली होती मात्र दोन दिवसांच्या पोलीस तपासा नंतर आत्महत्ये मागील कारण आणि आरोपी पोलीसांच्या हाती लागले.

रविवारी आत्महत्ये पूर्वी तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट ठेवली होती. पोलीस तपासा दरम्यान तरुणीच्या मोबाईलमध्ये असलेली ही नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यात तिने आत्महत्या करण्याचे नेमके कारण तसेच अत्याचार करणाऱ्यांची नावे लिहून ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार महिला दिड वर्षांपासून तिचे आठ सहकारी तिच्या सोबत लैंगिक अत्याचार करीत असत. याच अत्याचाराचे चित्रीकरण केले जात असे. आणि हाच शूट केलेला व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेलिंग केलं जातं होत. अश्या प्रकारची नाजूक बाब घरी सांगणे अवघड वाटत असल्याने, तसेच समाजात पसरले तर काय होईल? या भीती पोटी अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या तरुणीने अखेर आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले.

कोळसेवाडी पोलिसांनी सध्या आठही आरोपींना ताब्यात घेतले असून यात एका तरुणीचा देखील समावेश आहे. या आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी मागितली गेली आहे. सध्या या आरोपींवर कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा देखील नोंद केला जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कठोर कारवाई करण्याची मागणी समाजातून होऊ लागली आहे.

-संतोष दिवाडकर

Kalyan Crime: Suicide of a young woman after getting fed up with sexual harassment and blackmailing

मोठी बातमी! कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बाप आणि भावाकडून लैंगिक अत्याचार

Kalyan Crime : बाप आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कल्याण च्या कोळसेवाडीमध्ये उघडीस आली आहे. १६ वर्षाच्या मुलीवर बाप आणि भावा कडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घटना उघड झाल्या नंतर कोसळसेवाडी पोलिसांनी दोन्ही बाप बेट्याना अटक केली आहे.

कोळसेवाडी परिसरातील बाप लेकावर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाले आहेत. मित्राला चहा का दिला यावरून पीडितेच्या बापाने पिडीतेला बेदम मारहाण केली होती. यानंतर सामाजिक संघटनांना याबाबत माहिती मिळाली असता सखोल विचारपूस केल्यानंतर अल्पवयीन पीडितेने नराधम बापाने आणि भावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांसमोर कथन केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ नराधम आरोपींना गजाआड केले आहे.

बाप आणि भावाकडून लैगिंक अत्याचार होत असल्याची माहिती आईसह शेजाऱ्यांना पिडीतेने दिली होती. यानंतर सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आणि घृणास्पद आणि संताप जनक प्रकार समोर आला. या प्रकरणी आरोपींना कठोर कारवाई होण्यासाठी देखील मागणी होऊ लागली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख व पोलिस अधिकारी बोचरे आणि कोळसेवाडी पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

-रोशन उबाळे

A minor girl was sexually abused by her father and brother in Kalyan

जामिनासाठी बनावट दस्तवेज तयार करणाऱ्या टोळीला न्यायालयात सापळा लावून केले अटक

कल्याण : कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटक आरोपींच्या नातेवाइकांकडून हजारो रुपयांच्या मोबदल्यात त्या आरोपीला जामिनावर मुक्त करण्यासाठी बनावट कागदपत्रासह बोगस जामीनदारांचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कल्याण गुन्हे (Kalyan Crime) शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात टोळीतील ५ जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.

महमद रफीक अब्दुल सत्तार शेख (रा. मालाड पुर्व, मुंबई ), जयपाल समाधान मजोगीरी (रा.धारावी मुंबई), संतोष कन्हैयालाल मौर्या (रा, विरार पुर्व), महमद हबीब महमद रफीक हश्मी (रा. जोगेश्वरी, पश्चिम), चंदु ऊर्फ चंद्रकांत अर्जुन खामकर (रा. ज्युचंद्र, वसई पुर्व जि.पालघर), असे अटक केलेल्या टोळीचे नाव आहे.

डोंबिवली रेल्वे स्थनाकात एकाची हत्येप्रकरणी अटक आरोपीला बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन देण्यासाठी काही जण सोमवारी कल्याण न्यायालयात येणार असल्याची खबर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, किशोर शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार कल्याण न्ययालयात सापळा रचला होता. त्यावेळी डोंबिवली रेल्वेच्या परिसरात हत्या करणाऱ्या आरोपीला हि टोळी बनावट कागदपत्रासह बोगस जमीनदाराला घेऊन आली असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना आरोपीला जामीन देण्याआधीच न्यायालयाच्या आवारात झडप घालून बनावट दस्तऐवजासह ताब्यात घेतले.

या टोळीतील मुख्य आरोपी चंदू उर्फ चंद्रकांत खामकर हा आरोपीना जामीन मिळवून देण्यासाठी लागणारे बनावट दस्तऐवज करण्यात माहीर असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या टोळीत आणखीही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून या टोळीने आतापर्यत किती बोगस जामीनदार न्यायालयात उभे करून आरोपींना जामीन मिळून देण्यात मदत केली. याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. तर आज पाचही आरोपीना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली आहे.

-रोशन उबाळे

Arrested for making fake documents for bail in kalyan

कल्याणमध्ये ३२ नागरिकांचे गहाळ फोन पोलिसांनी दिले शोधून

कल्याण : कल्याण मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या ३२ मोबाईलचा शोध घेवुन नागरिकांचे गहाळ झालेले ४ लाख ५० हजार किमतींचे मोबाईल परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, कल्याण यांच्या अंतर्गत असलेली महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणाऱ्या लोकांचे सन २०१९, २०२०, २०२१ या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबधीत पोलीस ठाण्यात प्रॉपटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या हरविलेल्या मोबाईलचा तात्रींक माहितीच्या आधारे शोध घेणे बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिलेल्या योग्य त्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अधिन असलेल्या वाहन व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि एच.जी ओऊळकर, पोहवा पवार, पोना गायकवाड, वाघ, वळवी, पोशि चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन अंदाजे एकुण ४ लाख ५० हजार  किंमतीच्या ३२ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन हे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत.

दरम्यान आपले गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या प्रती असलेला विश्वास आणखी दृढ झाला असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. (Kalyan Crime)

-कुणाल म्हात्रे