महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक ‘या’ महिन्यांत होण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणूक : महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुक केव्हा होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. राज्यातील चार महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्षानंतर हालचालींना वेग आला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून असे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षे लांबलेल्या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे संकेत दिले होते.

मागील वर्षी २०२२ पर्यंत २७ पैकी २३ महानगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तर त्याअगोदरच २०२० साली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि आणखीन तीन मनपाचा कार्यकाळ संपला होता. राज्यातील राजकारणात मागील पाच वर्षांत प्रचंड उलथापालथ झाल्याने आता महानगरपालिका निवडणूकीत कोणता पक्ष याचा फायदा घेईल हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाची युती तुटणे, पुढे महाविकास आघाडी तयार होणे, पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन होऊन भाजप सोबत सत्तेत जाणे या सर्व गोष्टींचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार आहेत.

संतोष दिवाडकर

Municipal elections in Maharashtra are likely to be held in these months

महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली भेळ; दिव्यात तरुण शिरले मनसेच्या ताफ्यात

दिवा : महाराष्ट्रातील राजकारणात मागील पाच वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. मात्र या सतत होणाऱ्या राजकीय बदलांना आता जनता कंटाळली आहे की काय असे चित्र पहायला मिळू लागले आहे. हेच कारण पुढे करीत दिव्यात आज असंख्य तरुणांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात हेच चित्र महाराष्ट्रभर सुरू राहील असे यावेळी मनसेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.

शंभरहुन अधिक आमदार असलेल्या भाजप पक्षाने सुरुवातीलाच अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी आटोपला होता. मात्र यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने अडीच वर्षे महाविकास आघाडीत सरकार चालवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेला मोठा बंड पाहता हे सरकार कोसळले आणि शिंदे भाजप सरकार सत्तेत आले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग होऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील जनता मात्र चांगलीच संभ्रमात पडली आहे.

राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा कोणत्याही युती आघाड्यांमध्ये नसून वेळोवेळी राज ठाकरे चालू स्तिथीवर भाष्य देखील करीत आहेत. मनसे हा सत्ता संघर्षापासून अलिप्त असलेला पक्ष असल्याने जनमानसात आमची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे सांगत कार्यकर्ते समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मनसे आणि राज ठाकरे हाच एकमेव उरलेला पर्याय असल्याचा पोस्ट समाज माध्यमांवर पहायला मिळत आहेत. याच विचारांतून मनसेत इनकमिंग सुरू असल्याचा दावा आता मनसे पदाधिकारी करू लागले आहेत.

संतोष दिवाडकर

In the presence of Raju Patil, the youth entered the MNS party

आर्य गुरुकुल शाळेत जागतिक योग दिवस साजरा

कल्याण : एज्युकेशन टुडे फाउंडेशन द्वारा संचालित नांदिवली स्थित आर्या गुरुकुल शाळेत २१ जून २०२३ रोजी योग सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पालक, शिक्षक, योगप्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम बुधवारी सकाळी ठीक ७:४५ ते १०:०० या वेळेत संपन्न झाला. सीबीएससी ने पुरवलेल्या प्रोटोकॉल नुसार प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. पालकांना व विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी यात दिली गेली.

आर्या गुरुकुलच्या एक महाराष्ट्र नवनिर्मित व एक एयर एस क्यू एन, एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच ऑनलाइन योगाचे आठ दिवसाचे शिबिर घेण्यात आले. व ऑनलाईन पद्धतीने पालकांचे व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन योगासन शिबिर घेण्यात आले.

इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा योगासने केली व योगसनाची कृती फायदे व लाभ सांगितले. तसेच योग या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग सुद्धा बनवलेले आहेत. शिक्षक व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन योग दिवस अगदी यशस्वी पद्धतीने साजरा केला गेला.

या प्रसंगी विद्यार्थी पालक व शिक्षकांनी संकल्प केला की मी स्वतः एक स्वास्थ शांतिप्रिय आनंद पूर्ण मनुष्य बनवण्याची संकल्पना करतो. माझ्या प्रत्येक कार्यातून विचारही बाजूंना शांती व स्नेहपूर्ण वातावरण बनवण्याचा व पूर्ण जगाला आपल्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीन. आर्या गुरुकुलचे संस्थापक श्रीयुत भरत मलिक सर म्हटले आमचा विश्वास आहे की योगा हे जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. याद्वारे आपण सर्व भेद व सीमा विसरून पूर्ण जग एकत्र करू शकतो .या कार्यक्रमादरम्यान आर्या गुरुकुलच्या चिन्मय सरगम द्वारा रचित व गायलेले गीतेची ध्वनी चालू होती या कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली.

संतोष दिवाडकर

World Yoga Day celebrated at Arya Gurukul School

Raj Thackeray in Kalyan : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कल्याण डोंबिवली दौरा ठरला

Raj Thackeray in Kalyan : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलीकडेच कोकण दौऱ्यावर असल्याचे पहायला मिळाले होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता १२ तारखे पासून ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. याच जिल्ह्यात सर्वाधिक बळ असलेल्या कल्याण डोंबिवलीचा दौरा ते १४ आणि १५ तारखेला करणार आहेत. अशी माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे झालेल्या आढावा बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना दिली.

जवळपास अडीच वर्षे प्रलंबित असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मनसे आता या शहरात सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज ठाकरेंच्या दौर्याविषयी माहिती दिली. रविवार दि.१४ मे रोजी ते कल्याण मधील पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर सोमवारी १५ मे रोजी डोंबिवलीतील मनसे पदाधिकार्यांची ते भेट घेऊन चर्चा करणार आहेत. पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी हा दौरा असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली प्रमाणेच राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे पार पडण्याची शक्यता आहे. मात्र मागील महापालिका पंचवार्षिक निवडणूकित मनसेची सर्वाधिक ताकद ही याच महानगरपालिकेमध्ये आहे. मनसेचे या महानगरपालिकेत १० नगरसेवक तसेच विरोधी पक्ष नेतेपद होते. शिवाय याच मनपा क्षेत्रात मनसेचे आमदार देखील आहेत. मनसेला याच मनपा क्षेत्रात दोन वेळा आमदारपद मिळाल्याने कल्याण डोंबिवलीत असलेली मनसेची ताकद आणखीन वाढविण्यासाठी मनसे आता काय प्रयत्न करणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

संतोष दिवाडकर

Raj Thackeray in Kalyan: MNS President Raj Thackeray’s Kalyan Dombivali Tour

खडेगोळवलीत भव्य शिवजयंती मिरवणूकीचे आयोजन

कल्याण :- संपूर्ण महाराष्ट्रभरात आज तिथी प्रमाणे असलेल्या शिवजयंती उत्सव सुरू आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथे शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. श्री राम चौकापासून सुरू झालेली ही मिरवणूक पुढे खडगोळवली मार्गे कैलाश नगर पर्यंत मार्गस्थ झाली.

या मिरवणुकीत पारंपारिक ढोलताशा पथकाचा एकच नाद घुमला होता तर मुलींची लेझीम देखील पहावया मिळाली. त्याचबरोबर चित्ररथ देखील आकर्षणाची बाब ठरले. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती असलेली वाहने देखील सामील झाली होती. त्याचबरोबर असंख्य रिक्षा मिरवणुकीचा भाग बनल्या होत्या.

दरवर्षी आम्ही अशाचप्रकारे भव्य मिरवणूक काढतो. या मिरवणुकीला शेकडो नागरिकांचा सहभाग असतो. आणि ही पुढेही अशीच सुरू ठेवणार असून आणखीन भव्य मिरवणूक काढत राहणार असल्याची प्रतिक्रिया माजी उपमहापौर विक्रम तरे व समाजसेवक मयुरेश तरे यांनी याप्रसंगी दिली.

संतोष दिवाडकर

Organizing a grand Shiv Jayanti procession in Khadegolvali

KDMC Corona Update : कल्याण डोंबिवली शहर बनले १००% कोरोनामुक्त

KDMC Corona Update : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र हे जवळपास २ वर्षे ९ महिन्यांनंतर १००% कोरोना मुक्त झाले आहे. आतापर्यंत आलेल्या तिन्ही लाटांमध्ये कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत होता. यानंतर हळूहळू कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या महापालिका क्षेत्रात बोटावर मोजण्या इतके रुग्ण आढळत होते. मात्र नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार महापालिका क्षेत्रात आता ० सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली शहर आता १००% कोरोना मुक्त झाली आहेत. मात्र त्याचबरोबर भारतात चौथ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने हा शून्याचा आकडा पुन्हा फुटण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे पहिला रुग्ण सापडल्या नंतर आता प्रथमच शहरात ० सक्रिय रुग्ण संख्या झाल्याचे दिसत आहे.

नव्या वर्षात कोरोनाची चौथी लाट स्वागताला उभी असून तिचा सामना करण्यासाठी आता केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर मागील तिन्ही लाटांदरम्यान महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर नव्या शिंदे भाजप सरकार समोर हे आव्हान असणार आहे. महानगरपालिका निवडणुका लांबणीवर पडल्याने कल्याण डोंबिवलीचे नवे शासक आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनाही शहराचा आकडा नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागू शकतात.

संतोष दिवाडकर

KDMC Corona Update : Kalyan Dombivli city became 100% corona free

MSEB Electricity Theft : कल्याण पूर्वेतील १३ बंगले मालकांची लाखोंची वीजचोरी उघडकीस

MSEB Electricity Theft :- महावितरणच्या कल्याण पुर्व एक उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत विशेषत: बंगले मालकांकडून सुरू असलेल्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून १३ बंगले धारकांची ७८ लाख ४९ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली आहे.

कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत सर्वाधिक वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर वीजचोरी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात १३ बंगले मालकांकडील ३ लाख २७ हजार युनिट विजेची चोरी पकडण्यात आली. यात भाल येथील एकाच बंगल्यात विनामीटर केबल टाकून सुरू असलेल्या ६ लाख ७२ हजारांच्या वीज चोरीचा समावेश आहे. तर नेवाळी येथील एका जीन्स कारखान्याची १३ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. नेवाळी, धामटण, भाल, वसार, व्दारर्ली आदी परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. एकट्या ऑक्टोबर महिन्यात या परिसरात ५९ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून ६८ लाख ४७ हजार रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला. संबंधितांना वीजचोरीचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत कळवण्यात आले असून ही रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड, उपकार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती व त्यांच्या टिमने ही कामगिरी केली. वीजचोरी शोध मोहीम यापुढे नियमितपणे राबविण्यात येणार असून आगामी काळात ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये तसेच अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

कुणाल म्हात्रे

MSEB Electricity Theft: Electricity theft of lakhs of 13 bungalow owners in Kalyan East exposed

दोन मित्रांकडून Nancy Finance ला ₹३५.६४ लाखांचा गंडा

Nancy Finance : दोन मित्रांनी मिळून ३५ लाख ६४ हजार रुपयांचा नेंन्सी फायनान्सला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्व तिसगाव नाक्यावरील विश्वकर्मा मेडिकलचा सचिन विश्वकर्मा आणि त्याचा मित्र पवनकुमार शुक्ला यांच्यावर कोळसेवाडी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण शहरातील नेंन्सी फायनान्स हिने वैश्विक महामारीच्या काळात आणि त्या अगोदरही छोट्या मोठ्या उद्योजकांना फायनान्स केले. तिसगाव नाक्या जवळील विश्वकर्मा मेडिकल स्टोरचा मालक सचिन विश्वकर्मा यांनी आपल्याला मेडिकल स्टोअर्स रीनोव्हेशन करून औषधे भरायची आहेत असं सांगून काटेमावली नाका येथील मान्यताप्राप्त नेंसी फायनान्स कडून ३६ लाख ६७ हजार ५०० रुपये चेक व रोख असे वेग वेगळ्या पद्धतीने घेतले. त्यातील १८ लाख २८ हजार ५०० रुपये त्याने परतावा केला.

सचिनचा दुसरा मित्र पवन शुक्ला याचे त्याच इमारतीत ड्राय फ्रुटचे दुकान होते. नेंन्सी फायनान्स कडून कोविड काळात १७ लाख २५ हजार रुपये कर्ज घेवून तो सध्या फरार झाला आहे. या दोघां मित्रांनी मिळून नेंन्सी फायनान्सची एकूण ३५ लाख ६४ हजारांची फसवणूक केली असल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून फसवणूक केलेल्या आरोपींना पोलिसांनी नोटीस दिल्याचे समजते.

मात्र लाखोंची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून आरोपी खुलेआम फिरत आहे का? तसेच ‘मै पैसा देगा नही। तुमको जो करना है वो करो।’ असे बोलुन फसवणूक पचवली जातेय का? हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

संतोष दिवाडकर

Nancy Finance defrauded of ₹35.64 lakh by two friends

मनसेच्या चिकणीपाडा जनसंपर्क कार्यालयाचा नूतनीकरण सोहळा संपन्न

कल्याण :- कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा नुतनीकरण सोहळा आज पार पडला. मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयात मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांच्या विध्यमाने शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत आहे. आज कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांच्या मनसे जनसंपर्क कार्यालयाचा नुतनीकरण सोहळा पार पडला. तसेच मनसेचे आमदार राजु पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयात मनसे तसेच आई सामाजिक संस्थेच्या संयुक्त विध्यमाने अल्पदरात शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंतच्या वेळेत हे शिबिर २९ सप्टेंबर पर्यंत सुरू असणार आहे.

यात पेनकार्ड, आधारकार्ड, मतदार कार्ड, हेल्थ कार्ड असे अनेक शासकीय कार्ड निगडित कामे करून देण्यात येत आहेत. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांनी नागरिकांना केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जितेंद्र वाघचौरे तसेच सुवर्णा वाघचौरे प्रभागातील अनेक समस्या सोडवत जन सामान्यांचे प्रश्न मार्गी लावले जातात असल्याचे आई सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा वाघचौरे यांनी सांगितले.

या दरम्यान जिल्हा सचिव संदीप नावगे, विधानसभा अध्यक्ष अनंत गायकवाड, डॉ. सुनील पांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे माजी अध्यक्ष अशोक भोसले, योगिता गायकवाड, सुधा शाहा यांनी उपस्थीती दर्शविली होती. या उपक्रमाचे आयोजन योगेश गव्हाणे मनसे उप शहर अध्यक्ष, जितेंद्र वाघचौरे मनसे उपविभाग अध्यक्ष, सुवर्णा जितेंद्र वाघचौरे आई सामाजिक अध्यक्षा, सहकारि सतिश (आप्पा) साळवी, सागर कोळगे, विशाल वाघचौरे, अमित मोरे, सीमा अहिरे, प्रार्थना वाघचौरे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

संतोष दिवाडकर

https://youtu.be/_A6gsv3k6cY
‘सेंट मेरी’ हायस्कूलला ‘मायक्रोसॉफ्ट शोकेस स्कूल’ प्रमाणपत्र प्राप्त

कल्याण : एक उच्चभ्रू मान्यता जी संपूर्ण भारतातील केवळ 40 शाळांना आणि जगभरातील केवळ 125 शाळांना दिली जाते. त्यात सेंट मेरी हायस्कूल, कल्याण, भारतातील नंबर 1 बजेट स्कूल झाली आहे, 33 वर्षांचा वारसा घेऊन, हायब्रीड लर्निंगला वास्तव बनवून भविष्याकडे वाटचाल करत आहे. 1989 मध्ये त्याच्या सुरुवातीपासून, जेव्हा काही शंभर विद्यार्थी आणि डझनभर वचनबद्ध शिक्षकांसह त्याची स्थापना झाली होती.

या वर्षी सेंट मेरी 33 व्या वर्षात पाऊल टाकत असताना, या खाजगी बजेट स्कूलमधून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर झाले, जीवनाच्या विविध क्षेत्रात टप्पे गाठलेल्या 6,000 पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यां पास आऊट झाले आहे. कृशांक मलिक व भूमिका यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम वर्गखोल्या तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

प्रमुख उपस्थितीत आमदार गणपत गायकवाड, यांनी आपल्या प्रेरक शब्दांनी उपस्थितांना संबोधित केले आणि त्यांची तीनही मुले सेंट मेरी आणि आर्य गुरुकुल शाळेमध्ये शिकले हे आभिमनाने सांगितले.

“सेंट. मेरीज हायस्कूल ही केवळ भारतातील सर्वोत्कृष्ट बजेट शाळा नाही तर जगातील सर्वोत्तम बजेट शाळा बनली आहे. शाळेने जागतिक स्तरावर जाऊन देशातील सर्वोत्कृष्ट शाळांना मागे टाकले आहे”, असे अली सैत यांनी घोषित केले.

या विशेष प्रसंगी डॉ. नीलम मलिक यांनी नीलिटची घोषणाही केली यात सेंट मेरीचा माजी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात चंगल्या पॅकेजचे जॉब मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी जितेश गायकवाड आणि भूषण इंगोले यांनी केले, ज्यांनी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले, तर काही संगीत आणि नृत्याचाही प्रेक्षकांनी आनंद घेतला.

भरत मलिक, संचालक म्हणाले, “प्रत्येक माजी विद्यार्थ्यांसाठी , शाळा आणि समाजासाठी.”
त्यांच्या ओघ शिक्षकांकडे परत येणे, आमच्या समवयस्कांशी जोडणे आणि मैत्रीचे बंध पुन्हा जिवंत करणे ही नेहमीच एक अभिमानाची भावना असते.

संतोष दिवाडकर