Kalyan East : १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून जवळपास ३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छाननी व अर्ज माघारी झाल्यानंतर आता १७ उमेदवार रिंगणात उतरले असल्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देखील आज देण्यात आले आहे.
- धनंजय बाबुराव बोडारे – शिवसेना उबाठा – मशाल
- ऍड.मिलिंद रविंद्र ढगे – बहुजन समाज पार्टी – हत्ती
- सुलभा गणपत गायकवाड – भारतीय जनता पार्टी – कमळ
- तृणेश अरूण देवळेकर- समता पार्टी – ट्रम्पेट
- प्रफुल रघुनाथ नानोटे – राईट टु रिकाॅल पार्टी – प्रेशर कुकर
- विशाल विष्णू पावशे – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
- शालीनी राजेंद्र वाघ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) – आटो रिक्षा
- शैलेश राममूर्ती तिवारी – प्रहार जनशक्ती पक्ष – बॅट
- हरिश्चंद्र दत्तु पाटील – संघर्ष सेना – शिट्टी
- त्रिशला मिलिंद कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
- कैलाश रमेश लाल चैनानी – अपक्ष – दुरदर्शन
- ऍड. धनंजय बप्पासाहेब जोगदंड – अपक्ष – संगणक
- प्रविण महेश घोरपडे – अपक्ष – रबर स्टॅम्प
- महेश दशरथ गायकवाड – अपक्ष – अंगठी
- महेश प्रकाश गायकवाड – अपक्ष – पत्र पेटी
- विवेक श्रीकांत पांडे – अपक्ष – सिरिंज
- सीताराम अण्णासाहेब गायसमुद्रे – अपक्ष – शिवण यंत्र
वरील १७ उमेदवार उर्वरित १७ दिवस निवडणूकीच्या आखाड्यात आपल्या ताकदीनिशी उतरले असून २० नोव्हेंबर रोजी जनतेचा कौल मिळवणार आहेत. पक्षांची बदललेली राजकीय समीकरणे, मतदारसंघातील परिस्थिती यावर कोणता उमेदवार कल्याण पूर्वेच्या सर्वाधिक मतदारांच्या पसंतीस उतरतो यासाठी २३ नोव्हेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मात्र त्यापूर्वी २० नोव्हेंबर पर्यंत आपल्या पारड्याचे वजन वाढविण्यासाठी सर्वच उमेदवार जोर लावणार यात शंकाच नाही.
Kalyan East: ‘These’ 17 candidates will contest the seat of Kalyan East; Election symbols received