कल्याण-डोंबिवली घडामोडी

सकल ब्राह्मण समाजाचा रविंद्र चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा

डोंबिवली : आपल्या भारत देशाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा थोर इतिहास असून या दोन्ही ब्राह्मण तज्ञ मंडळींना भारतरत्न मिळायला हवे. पण त्यासाठी हिंदुत्व विचारांचा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी पाठवावा लागणार आहे. डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिली असून हिंदुत्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना त्यांना आवर्जून मतदान करणे गरजेचे असल्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, प्रखर हिंदुत्ववादी नेते सुनील देवधर यांनी केले आहे.

ब्राह्मण सभेत जमलेल्या हजारो ब्राह्मण मंडळींनी चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा सामूहिक निर्णय यावेळी घेतला. ब्राह्मण सभेत संपन्न झालेल्या सकल ब्राह्मण समाज मेळाव्यामध्ये सर्वानुमते तसे ठरवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. आयोजित सभेत भाजपलाच का मतदान द्यावे याबाबत देवधर यांनी जनजागृती केली. अर्थतज्ञ फडणीस यांनीही आपले विचार मांडले तसेच मोदीच का या त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या १०१ कारणांपैकी काहींचा उल्लेख करून त्यांनी हिंदुत्व पटवून दिले.

मंत्री चव्हाण यांनी शहरातील अपप्रवृत्ती कशा वाढल्या होत्या, त्या समूळ नष्ट करायला किती वेळ गेला याबाबत उदाहरण देऊन माध्यमांनी जे लिहायला हवे ते परखड शब्दांत मांडले. शहरातील सर्व ब्राह्मण समाजाचे पदाधिकाऱ्यांचे मला सातत्याने मार्गदर्शन मिळते, त्यांचा मी ऋणी आहे असेही ते म्हणाले. यावेळी माधव घुले, प्रदीप जोशी, जे के जोशी, मनीषा धोपटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव जोशी, पद्माकर कुलकर्णी, सप्तर्षी, श्री गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्ष अलका मुतालिक, ऍड वृन्दा कुलकर्णी, ब्राह्मण सभा अध्यक्ष राहुल दामले, संदीप पुराणिक, प्रज्ञेश प्रभुघाटे, मानस पिंगळे, मधुकर कुलकर्णी, शशांक खैर, अमरेंद्र पटवर्धन, गौरी खुंटे, शमा भाट्ये, यांसह हजारो ब्राह्मण मंडळी उपस्थित होती.

Unconditional support of the entire Brahmin community to Ravindra Chavan

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *