मंगळवार दिनांक २७ जुलै रोजी अंगारकी चतुर्थी असून प्रतिवर्षी आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक गणेश भक्त लांबून लांबून टिटवाळा नगरीत येत असतात. यावेळी मोठ्या प्रमाणांत मंदिर परिसरात गर्दी होत असते.
या वर्षीदेखील कोरोनाचे सावट असून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंदिराच्या आवारात भाविकांची खूप गर्दी होण्याची शक्यता आहे . कोरोना महामारीचे संकट हे अद्यापही टळले नसल्याने अंगारकी चतुर्थीला कोरोना प्रतिबंधक नियम भाविकांकडून पाळले गर्दी अभावी पाळले जाणार नाहीत. आणि म्हणूनच मंगळवार दिनांक २७ जुलै रोजी अंगारकी चतुर्थीला मंदिराचे आवार पूर्ण दिवस रात्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुखदर्शन देखील बंद राहील असे मंदिर विश्वस्तांकडून एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे सांगण्यात आले आहे. भाविकांना होणाऱ्या त्रासाबद्दल विश्वस्तांनी दिलगिरी व्यक्त केली असून ग्रामस्थांनी व्यापारी व भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-कुणाल म्हात्रे