आरक्षित भुखंडावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आरक्षित भुखंडाच्या सीमेवर झाडे लावून भुखंड सुरक्षित ठेवण्याबाबत निर्देश दिले असल्याने आरक्षित भुखंडावर झाडे लावण्यात येत आहेत. कल्याण पुर्वीतील “ड” प्रभाग क्षेत्रातील आमराई विजय नगर परिसरातील धर्मवीर आनंद दिघे उद्यान या आरक्षित भुखंडावर विदर्भ युवक मंडळ यांच्या आयोजना नुसार रक्षा बंधन व नारळीपोर्णिमेचे औचीत्त साधुन विभागीय उप आयुक्त अनंत कदम यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल, स्थानिक नगरसेविका माधुरी काळे, माजी नगरसेवक प्रशांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याण पूर्व मध्ये रक्षाबंधन दिवशी वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षांची रक्षा करणे हे आजच्या निसर्गाच्या नियमांची गरज भासली आहे. वृक्षतोडीमुळे अनेक ठिकाणी निसर्गाचा नियम पायमल्ली झाल्यामुळे जीवित हानी पासून सृष्टीची हानी देखील सुरू आहे, माणसाने आपल्या सोयीनुसार अनेक बांधकामं, रस्ते तयार केलेत आणि भरमसाठ वृक्षतोड झाली. ऑक्सिजनची कमतरता शहरांमध्ये भासत आहे. याकरिता सृष्टी रक्षा हेच “रक्षाबंधन व्हावं” या उद्देशाने कल्याण पूर्व मध्ये माधुरी प्रशांत काळे यांनी सामाजिक संस्थेसोबत वृक्षारोपण घेवून मोलाचे कार्य केले आहे.

या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमात प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका माधुरी काळे यांनी स्वेच्छेने वृक्षारोपणासाठी झाडे ,फुलझाडे देण्याच्या मागणीस चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी दिलेली ही झाडे त्यांच्या नावाने लावण्यात येणार आहेत. यावेळी ड प्रभाग अधीक्षक संजय कुमावत, विदर्भ युवक मंडळाचे संस्थापक पी. डी. चौधरी, अध्यक्ष उत्तम पाटील, सचिव सुरेश ढगे, विश्वस्थ विजय गैगावली, सुरेखा कपले, कासार, सिद्धिविनायक सामाजिक संस्थेच्या संचालिका सुरेखा गौरे, आशा चौधरी, विजय नगर हौसिंग फेडरेशनचे सचिव प्रदीप तांबे, खजिनदार, वासुदेव कदम, संचालक कानसे, संभाजी माने, नरेश कासार, किरण गौरे, विनय ठोकळे आदींसह नागरिक उपस्थित होते.
-कुणाल म्हात्रे
