पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये आठवणींचे झाड या मोहीमेची सुरुवात कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडीवरील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गुहेच्या परिसरात पिंपळ व कडूलिंबाच्या रोपणाने करण्यात आली.
कोरोना काळात आपल्या जवळच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना ऑक्सीजन अभावी व कोरोनामुळे आपल्याला गमवावे लागले. आपल्या आप्तस्वकीयांची आठवण म्हणून, किमान १ झाड लावण्याचे आवाहन जेष्ठ शिक्षक अंकुर आहेर आणि इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. रेल चाईल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली (प.) तसेच इतिहास संकलन समिती, डोंबिवली व इकोड्राईव्ह यंगस्टर्स, कल्याण यांनी एकत्र येऊन, ‘आठवणींची झाडे’ लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.
आठवणींचे झाड या अभियानात सहभागी होत वृक्षारोपण करून 9773430684 या क्रमांकावर फोटो पाठविण्याचे आवाहन इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन तर्फे महेश बनकर यांनी केले आहे.
–कुणाल म्हात्रे