गेल्या वर्षभरापासून महावितरणच्या खडवली कार्यालयातील कनिष्ठ अभियंता हे पद रिक्त होते. त्यामुळे, व्ययस्थापणा अभावी नागरिकांना विजेच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. गेल्या काही महिन्यांपासून, हे रिक्त पद भरण्यात यावे, यासाठी मनसे तर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पाठपुराव्यासाठी खडवली पंचक्रोशीतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टिटवाळा महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या खडवली कार्यालयातील कनिष्ठ अभियंता पदावर अलंकार म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या मंगळवार पासून ते कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या अनुभवानुसार आणि व्यवस्थापन कौशल्याने लवकरच विजेच्या समस्या मार्गी लागतील अशी आशा मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-कुणाल म्हात्रे
