छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण येथे पर्यावरण दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. एक विद्यार्थी एक रोप या उपक्रमाअंतर्गत अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमा प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, संस्था पदाधिकारी धनंजय पाठक आणि भारती वेदपाठक त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, सांस्कृतिक प्रमुख भोसले मॅडम आणि पवळे सर त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष म्हणजे खिळेमुक्त झाड अभियानाअंतर्गत काम करणारे शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश पाटील, स्वप्नील शिरसाठ आणि भूषण राजेशिर्के यावेळी उपस्थित होते. अंघोळीची गोळी संस्थेच्या खिळेमुक्त झाड अभियानाची माहिती यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली. भारत विकास परिषदेतर्फे आयोजित स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातुन सहावा क्रमांक प्राप्त शाळेचा आजी विद्यार्थी कुमार यश यादव देखील कार्यक्रमात उपस्थित होता. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
त्याचप्रमाणे २०१६ साली शाळेत वृक्षारोपण केले गेले होते त्या वृक्षांना पाच वर्ष पूर्ण झाली त्यांचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला. सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण केले गेले मान्यवरांचा तुळस रोप देऊन सत्कार करण्यात आला. केवळ वृक्षलागवड नाही तर वृक्षसंवर्धन, वृक्ष संरक्षण करण्याचा सर्वांनी निर्धार करावा असे मुख्याध्यापिका सय्यद यांनी यावेळी आवाहन केले.
-कुणाल म्हात्रे