कल्याण :- पश्चिमेतील ताल बार मध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांसह कल्याण डोंबिवली मनपाचे भाजपा माजी उपमहापौर यांच्या भावासह सहा जणांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा अशी धमकी बार मॅनेजरला दिली. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण सत्र न्यायालयाने आरोपीना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. मंगलसिंह भंवरसिंह चौहान, हरीश्याम सिंह, रिकिन गज्जर, पोलीस कर्मचारी उत्तम घोड़े, विक्रांत बेलेकर आणि शेखर सरनोबत आरोपींची अशी नावे आहेत .सर्व आरोपी आंबिवली, मोहने, यादवनगर, टिटवाला और हीराबाग-शनिवार पाटीलनगर मधील रहिवाशी आहेत
दरम्यान या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असं या पोलीस कर्मचार्याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असून चाळ माफियाकडून हफ्ते वसुली करत आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि याच चाळ माफिया सोबत हा पोलिस कर्मचारी पार्टी करायला आला होता. हॉटेल मालकाला शेरकी मिरवण्याच्या नादात सर्वत्र स्वतःची बदनामी करून घेतली आहे.
-रोशन उबाळे