कल्याण पोलीस परिमंडळ -३ मधील दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या कारणाने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही घटनांमध्ये टवाळखोरांनी आपली दहशत दाखविली असल्याचे दिसत आहे. या दोन्ही घटना सोमवारी ९ ऑगस्ट रोजी घडल्या आहेत.
कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार ओव्हटेक केल्याच्या कारणावरून अज्ञात कार चालकाने ओव्हरटेक का केली या कारणाने कार ची समोरची काच फोडली तर त्याच गाडीमागे असणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना मारहाण करीत मोबाईल आणि पैश्याचे पॉकेट हिसकावून नेले. तर दुसरीकडे कल्याण पश्चिम स्टेशन परिसरामध्ये महात्मा फुले पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तिघांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जन गंभीर जखमी झाले.

एकाच दिवशी घडलेल्या दोन्ही घटनांमुळे कायद्याचे भय कल्याण मध्ये राहिले की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आनंद दिघे पूलाखाली कोळसेवाडी पोलिसांची हद्द संपते म्हणूंन महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पीडित याना पाठवण्यात आले. एकाच दिवसात पाठोपाठ तीन घटना घडल्याने कोरोना काळात आधीच पिचलेल्या नागरिकांत या प्रकारामुळे दाहशतीचे वातावरण पसरलेले दिसत आहे. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात वारंवार घडणाऱ्या घटना कमी करण्यासाठी पोलिसांची अधिक गस्त वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
-रोशन उबाळे