कल्याण :- बिर्ला कॉलेज जवळील परिवहन प्रादेशिक कार्यालय परिसरामध्ये असणाऱ्या बेकायदेशीर टपऱ्या व अतिक्रमणावर नुकतीच कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या ‘ब’ कार्यालयातील आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी आपल्या पथकासह ३० ते ४० अतिक्रमानावर धडक कारवाई केली आहे. परिसरामध्ये अनेक बेकायदेशीर टपर्या लावल्याने लोकांना येण्या जाण्यास आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण केला होता.
चंद्रमणी उपाध्याय यांनी होणाऱ्या त्रासा विषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. यानंतर जेसीबी, पोलीस फाटा आणि महापालिका कर्मचारी बाळू शिंदे, म्हात्रे , शेवाळे, महाले आणि पथक कर्मचारी उपस्थित होते. या छोट्याशा पण महत्त्वाच्या कारवाई नंतर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
-रोशन उबाळे