रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन व आरोग्य विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा चालकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून यासाठी संघटनेच्या कार्यालयात नाव नोंदविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
रिक्षाचालक राञं दिवस शहरात व इतर ठिकाणी प्रवासी वाहतुक सेवा बजावत असतात अनेक प्रकारे विविध प्रवाशी नागंरीकाशी नित्य रोज संर्पक येतो. कोरोना काळात खबरदारी सुरक्षितता याकरीता प्राधन्याने रिक्षा चालकांचे लसिकरण करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने केडीएमसी आयुक्त डाँ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत रिक्षा चालकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने सकारात्मकता दर्शवली आहे. संघटनेच्या वतीने प्रणव पेणकर, संतोष नवले, जितेंद्र पवार, हेमंत सांगळे आदींनी यावेळी आरोग्य आधिकारी डाँ. अश्विनी पाटील यांची भेट घेत लसीकरणाच्या नियोजनाबाबत चर्चा केली.
ज्या रिक्षा चालकांचे लसिकरण बाकी असेल व ज्यांचे आधारकार्ड पत्ता नोदं कल्याण शहराचा असेल त्यांनीच फक्त संघटनेच्या जनसंर्पक कार्यालय व विभागवार नियुक्त पदाधिकारी यांच्याकडे नावं नोंदविण्याचे आवाहन संघटनेने केले असून लसिकरणाचे ठिकाण, वेळ, तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
-कुणाल म्हात्रे