मागील माही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून सर्व पूरग्रस्त विभागातील नागरिकांना आर्थिक व सर्वोतोपरी मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुखांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
१७ ते २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व मधील खडेगोळवली, वालधुनी, अशोक नगर, शिवाजी नगर, नेहरू नगर, आनंदवाडी, साई नगर, कैलास नगर या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या चाळी मध्ये पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांच्या घरातील बहुतांश सामान अन्न धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होऊन नागरिकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. या विभागातील राहणारे सर्व नागरिक हे गरीब व मध्यमवर्गीय असून मोल- मजुरी व नोकरी धंदा करणारे असून या कोरोना च्या काळामध्ये अनेक नागरिक बेरोजगार आहेत. त्या मध्ये आलेल्या या नेसर्गिक आपत्ती मुळे त्यांची पूर्ण वाताहत झाली आहे.
या सर्व नागरिकांना कोणताही आधार नसल्यामुळे या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून या पूर ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करून आधार देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
-कुणाल म्हात्रे