नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे कल्याण मधील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. पुराच्या या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून याची भरपाई म्हणून पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत त्वरित देण्याची मागणी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. यावेळी आढाव यांच्यासमवेत कल्याण शहर अध्यक्ष विश्वास चिकणे, कार्याध्यक्ष रवी शिवाळे, सामजिक कार्यकर्ते प्रदीप गवाळे उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे कल्याणच्या विविध परिसरासह प्र.क्रं. १६, मिलिंद नगर घोलप नगर येथे संपुर्ण परिसरात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संपुर्ण परिसर हा पाण्याखाली गेला होता. येथील नागरिकांचे व सर्व व्यापारी वर्गाचे खुप नुकसान झाले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना काल खंडामध्ये लॉक डाऊन असल्यामुळे सर्व नागरिक हतबल झाले असताना या पुर परिस्थितीमुळे लोकांची परिस्थिती खुप बिकट झाली आहे. त्यामुळे या पूरपरिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून प्रत्येकी कुटुंबास २५ हजार रुपयांची तात्काळ मदत करण्याची मागणी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव यांनी केली आहे.
-कुणाल म्हात्रे