कल्याण :- कल्याण फोर्टीस् हाँस्पीटल परिसरात बुधवारी सकाळी मुंगुसाची हत्या केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौघांना अटक केली. पोलिसांनी पुढे या सर्व आरोपींना कल्याण वनखात्याच्या ताब्यात दिले. या आरोपीना वन खात्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार पर्यंत कोठडी सुनावण्यात आली असल्याचे कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी सांगितले.
सांधेदुखीवर औषध म्हणून मुंगुसाच्या चरबीच्या तेलाला मोठी मागणी असून मुंगसाच्या केसाचा वापर ब्रश बनविण्यासाठी होतो. यामुळे मुंगूसाला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने आरोपींनी मुगंसाची शिकार केली असावी असा प्राथमिक अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
संजू समय्या मोटम (वय 32), भोलानाथ शंकर पास्तम (वय 30), जलाराम समय्या पास्तम (वय 32), बसवय्या शंकर पास्तम (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. सर्व आरोपी मांडा टिटवाळा येथील व वासुंद्री रोड परिसरात राहणारे आहेत.
-रोशन उबाळे