कल्याण : कल्याण मध्ये म.फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा शोध लावत ते नागरिकांना परत करण्याची कामगिरी कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या टीमने केली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, यांच्या अंतर्गत असलेली म.फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणाऱ्या लोकांचे सन २०१८, २०१९, २०२० या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबधीत पोलीस ठाण्यात प्रॉप्रटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
या हरविलेल्या मोबाईलचा तात्रींक माहितीच्या आधारे शोध घेण्या बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील व त्यांच्या वाहन चोरी विरोधी व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि एच. जी.ओऊळकर, पोहवा पवार, पोना गायकवाड, वाघ, पोशि चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे एकुण ४४ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन हे मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षात नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधून परत करण्यात आले असून, स्टेशन परिसर, गर्दीच्या ठिकाणी अथवा ज्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल अथवा इतर वस्तू चोरी होतात अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली असून चोरीच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त लावून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील यांनी दिली.
दरम्यान नागरिकांना आपले हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ओतूर येथील उषा तांबे यांचा २०१९ साली कल्याण पश्चिमेतील रामबाग येथून मोबाईल गहाळ झाला होता. त्यांना देखील आपला मोबाईल मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
-कुणाल म्हात्रे
माझा फोन 30 जून 2021 ला कल्याण पश्चिम बस स्टँड वर चोरी झाला त्याबाबत रितसर तक्रार केली आहे पण अजून काही रिप्लाय आला नाही तरी माझी विनंती आहे मा, माने साहेब कृपया माझा फोन मला मिळवून द्यावा आपला शतशः आभारी राहीन फोन मॉडेल ओप्पो A53 माझं नाव विवेक खांडेकर कल्याण तलाठी ऑफिस शेजारी असलेल्या पोलीस चौकीत आणि शहाड जवळ महात्मा फुले येथील पोलीस स्टेशनमध्ये कॉम्प्लेनट केली आहे पोच आजही माझाकडे आहे त्वरित सहकार्य ची अपेक्षा
Sir Mera bhi mobile chori hogaya hai toh kya Karna hoga